सहकाररत्न पी.एफ. डान्टस यांच्या पार्थिवावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार
सावंतवाडी
कॅथॉलिक तसेच सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष सहकाररत्न पी. एफ. डान्टस यांना आज भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. सावंतवाडी येथील सिमेट्रीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वपक्षियांसह सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, डान्टस यांच्या जाण्यामुळे माजी सैनिकांसह सहकार क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांचे कार्य असेच पुढे चालू ठेवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशा शब्दांत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्याप्रती आदरांजली वाहिली. माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब, मनीष दळवी, साक्षी वंजारी यांच्यासह अन्य मान्यवरांनीही यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी सैनिक बँकेचे चेअरमन बाबुराव कविटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शिवराम जोशी, रुजाय रॉड्रीस, तातोबा गवस, चंद्रशेखर जोशी, दिनानाथ सावंत, अशोक म्हाडगुत, कॅथॉलिक बँकचे सीईओ जेम्स बोर्जेस, तहसिलदार श्रीधर पाटील, प्रा. विलास सावंत, मार्टिन आल्मेडा, मायकल आल्मेडा, मायकल डिसोजा, डॉ. विलास सावंत, बापू गावडे, वैशाली गावडे, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्टस, दीपक राऊळ, प्रकाश सावंत, फादर मिलेट डिसोजा, ऑगस्तिन फर्नाडिस, भिवा गावडे, बाबु कुडतरकर, बबन राणे, नितिन गावडे, विक्रम चव्हाण, डॉ. वसंत पाटील, राजन पोकळे, बावतिस फर्नांडिस, बाबल आल्मेडा, आनमारी डिसोझा आदींसह ख्रिस्ती बांधव, माजी सैनिक तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.