You are currently viewing “ईश्वरीय ऋण”

“ईश्वरीय ऋण”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुण गांगल लिखित अप्रतिम गीत रचना*

 

*”ईश्वरीय ऋण”*

 

ईश्वरा आम्ही मानतो ऋण स्मरण

चिंतन करितो आम्ही अहो भाग्यवानIIधृII

 

तव आशीर्वादे चालते नर जीवन

डोक्याच्या केसांपासून नखापर्यंत

रात्रंदिन फिरविशी रक्त नसांतूनII1II

 

चालते हृदय मेंदू जठर यकृत

दोन नेत्र कान दोन पाय हात दोन

चालविसी अनाकलनीय अद्भुत II2II

 

शरीर स्नायू सांधे बोटे दहा छिद्र

दशेंद्रियांसह भावनाशील मन

सुखदुःख विसरण्याचे वरदानII3II

 

जिभेवर आर्द्रता ठेवतो नियमित

संवेदना निर्मितोस रुची ज्ञान

अवयव कार्य करिती तव आज्ञेनं II4II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.

Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा