‘एक मच्छिमार दोन परवाने’ संकल्पना राबवावी…
राष्ट्रीय मत्स्य संमेलनात रविकिरण तोरसकर यांनी मांडली भूमिका..
मालवण
सहकार भारती संघटनेतर्फे वाशी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मत्स्य संमेलनात मालवण येथील मच्छिमार नेते आणि नीलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी मच्छिमारांना मच्छिमारीबरोबरच पर्यटन व्यवसाय करण्याच्या दृष्टीने ‘एक मच्छिमार दोन परवाने’ ही संकल्पना राबवावी, अशी भूमिका मांडली. राष्ट्रीय स्तरावर प्रथमच अशी भूमिका मांडण्यात आली. या भूमिकेला उपस्थित मान्यवर व देशभरातील मच्छिमार प्रतिनिधीनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती रविकिरण तोरसकर यांनी दिली.
वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात शुक्रवारी हे राष्ट्रीय मत्स्य संमेलन पार पडले. या संमेलनास २५ राज्यातील ६०० मच्छिमार प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये गोडे पाणी, खारेपाणी तसेच निमखारे पाण्यातील मच्छिमार संघटना व मत्स्य शेतकरी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा मोठ्या प्रमाणात आले होते.
या राष्ट्रीय मत्स्यसंमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मत्स्योद्योग मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री रुपाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मत्स्यव्यवसाय संदर्भात सुरू केलेल्या योजनांचा तसेच गेल्या नऊ वर्षांमध्ये वाढलेल्या आयातीचा उल्लेख करत मत्स्यव्यवसाय मध्ये भारत अग्रेसर असल्याबाबत सांगितले. तसेच त्यांनी उपस्थित प्रतिनिधींना आपल्या समस्या व सूचना सहकार भारती मार्फत केंद्रीय मत्स्योद्योग मंत्रालयाला अवगत करण्यास सांगितले. यावेळी एकीकृत मत्स्य पालन विकास या विषयाच्या अनुषंगाने संमेलनात विविध चर्चासत्रे संवाद व तज्ञांचे मार्गदर्शन झाले.
यावेळी देशभरातून आलेल्या विविध प्रतिनिधींनी आपापले म्हणणे मांडत विविध समस्याबाबत सूचना केल्या. यामध्ये प्रथमच राष्ट्रीय स्तरावर एक मच्छीमार दोन परवाने ही संकल्पना रविकिरण तोरसकर यांनी मांडली.
केंद्रीय सागरी मत्स्योद्योग धोरण २०१६ च्या अंतर्गत मच्छीमारास मासेमारी तसेच पर्यटन असे दोन परवाने देण्याबाबत तरतूद केली आहे. या तरतुदीचा वापर करून त्याचे कायद्यात रूपांतर व्हावे, जेणेकरून मच्छीमारास मासेमारी बरोबरच पर्यटनातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल, अशी भूमिका तोरसकर यांनी मांडली. राष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारची भूमिका पहिल्यांदाच मांडण्यात आली. यावर उपस्थित सहकार भारती राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, राष्ट्रीय संयोजक -सहकार भारती- मत्स्यप्रकोष्ट, जयंती केवट यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एक मच्छीमार दोन परवाने या संकल्पनेला उपस्थित मच्छिमार प्रतिनिधींकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या संमेलनास आमदार रमेश पाटील, आमदार गणेश नाईक, आमदार श्रीमती मंदाताई म्हात्रे, महाराष्ट्र फिशरमन फेडरेशनचे अध्यक्ष रामदास संधे, सहकार भारती मत्स्यप्रकोष्ट महाराष्ट्र संयोजक वासुदेव सुरजुसे, डॉ. विवेक वर्तक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*समर्थ विग कॅन्सेप्टस्*
*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*
*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*
*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂
◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*
*फक्त आणि फक्त एक तास*😱😃
★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*
*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*
*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*