You are currently viewing ज्याची भूक तोच सोबती

ज्याची भूक तोच सोबती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा. सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ज्याची भूक तोच सोबती*

 

नाही फुलाची नाही दलाची

भूक लागली कधी मला ही |

अश्मदेवा फूल वाहण्याची

रीत मानवी भासे मला ही ||१||

लागलीच ओढ चिंतनाची

ज्ञात झाले तेव्हाच मला ही |

जीवनालाच गरज आहे

निर्जीव सजीव ती मला ही ||२||

अलौकिक या निर्मितीतला

सर्वा वेगळे स्थान मला ही |

माझ्या दिव्य या भुमिकेतला

मी आहे ओळखून मला ही ||३||

अंतर्मना बहिर्मन माझे

स्वजाणीव साथ दे मला ही |

असो थोर भक्ती मनी माझे

जगा शांती लाभे ती मला ही ||४||

असे बाहेरी तोच अंतरी

न दिसे अंतरी का मला ही |

सोबती सदा शोधतो तरी

सत्य कळले आता मला ही ||५||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता. :- वेंगुर्ला,

जि. :- सिंधुदुर्ग, राज्य :- महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा