You are currently viewing माझे नारायणा

माझे नारायणा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य वैद्यराज कविवर्य भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

🪷🪷 *माझे नारायणा* 🪷🪷

 

पांडुरंगा बाप व्हा हो ।

बालकाला जाण द्या हो ।

भाव श्रद्धा वाढू द्या हो ।

माझे नारायणा ।।

 

पांडुरंगा बंधु व्हा हो ।

अहंकारा बंध द्या हो ।

दुःखा रसातळी न्या हो ।

माझे नारायणा ।।

 

पांडुरंगा सखा व्हा हो ।

मज थोडा धीर द्या हो ।

वेदनांना दूर न्या हो ।

माझे नारायणा ।।

 

पांडुरंगा आई व्हा हो ।

भवसागरी तारा हो ।

ज्ञानामृते उद्धरा हो ।

माझे नारायणा ।।

 

🙏🙏

कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.

नाथसदन , पिंपळनेर ,

ता. साक्री , जि. धुळे 424306

9823219550/8888252211

प्रतिक्रिया व्यक्त करा