You are currently viewing रोहिणी प्रकाशनाची; उत्तुंग झेप…!

रोहिणी प्रकाशनाची; उत्तुंग झेप…!

प्रकाशन जगतात आपल्या तत्तपर आणि कार्य निष्ठेने, लोकप्रिय ठरलेले, महाराष्ट्रातील नांमकित साहित्यिक कवी, लेखक, कथाकार यांची अनेक पुस्तके प्रकाशित केलेले. मराठी पुस्तका बरोबर हिंदी पुस्तक ‘लफ्ज- ए-दिल’ इतर पुस्तक प्रकाशित. मराठीत अनेक दर्जेदार प्रातिनिधिक काव्यसंग्रह, यामध्ये प्रमु्ख्याने, फेसबुक चारोळी मंच प्रस्तुत ‘काव्यभ्रमंती’, यासह सहा पुस्तके. आणि ‘लेखणीतील कलाकार काव्यमंच’ समूहाचे पाच- सहा प्रातिनिधिक काव्यसंग्रह तर, ‘लेखन अन् मी समूह प्रस्तुत, महाराष्ट्रातील एकून अठरा साहित्यिक, लेखक यांच्या दर्जेदार लेखणीतून “गुफण” प्रातिनिधिक कथासंग्रह दमदार निर्मिती, रोहिणी प्रकाशन यांनी यशस्वी पार पाडलीआहे.

आज ५ आक्टोबर रोजी,रोहिणी प्रकाशनाचे एक वर्ष होउन, दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. ‘रोहिणी प्रकाशन नवी मुंबई, प्रकाशिका रोहिणी रामू वाघमारे. यांनी आपले बी. एस.सी. केमेस्ट्री शिक्षण झाले असून, पुढील शिक्षण विद्यमान आहे.प्रकाशिका यांच्या मनात शिक्षण घेत असतानाच “आपण समाजाचे देणे आहोत” आणि समाज घडून आणण्यासाठी आपलेही काही दायित्व आहे, या उद्देशाने त्यांनी तमाम…. लेखक, कवी साहित्यिक यांना, रोहिणी प्रकाशन द्वारे आपले लेखन, विचार जो समाज घडवतात, अशा विविध साहित्यिकांना त्यांना आपल्या प्रकाशनाद्वारे मान देऊन आतापर्यंत, तब्बल ‘पाचशे’ हूनअधिक लेखकांचे विविध पुस्तक प्रसिद्ध करून साहित्य क्षेत्रात नावलौकिकआहे.

प्रकाशन क्षेत्रात पदार्पण , रोहिणी रामू वाघमारे यांची कारकिर्दीद…

वयाच्या एकविसाव्या वर्षी विद्यार्थीनी ते कवीयत्री लेखिका तर, उत्तम प्रकाशिका… ! जीवनाच्या प्रवासात तळा- गाळातील शेवटच्या टोकाला अंधारात चाचपडत, असलेल्या प्रत्येका पर्यंत ज्ञान प्रकाश पसरला पाहिजे, त्याकरीता श्रीमंत पासून गरीबातील गरीबा पर्यंत पुस्तक पोचली पाहीजे.अशा उद्धाथ भावना प्रकाशिका यांच्या मनात दिसून येतात. याचे कारण असे की, सध्याच्या ‘स्पर्धा युगात तथा या महागाई’ जीव घेण्याकाळात,प्रकाशिका रोहिणी मॅम यांच्या प्रकाशनाच्या पुस्तकांचे दर सुद्धा वाजवी असेच असून, सामान्य माणूसा ते तमाम वाचक- रसिक यांना परवडणारे असेच म्हणावे लागेल.

आज…. ५ आक्टोबर रोजी, रोहिणी पब्लिकेशन नवी मुंबई, यांच्या ‘ एक वर्षीपुर्ती ‘ . निमित्त हार्दिक शुभेच्छा…!

………………………….

बबनराव वि. आराख

गांगलगाव

जि. बुलडाणा

७८७५७०१८९६

प्रतिक्रिया व्यक्त करा