देवगड :
मुणगे करिवणेवाडी येथील प्रसिद्ध भजनी बुवा,प्रसिद्ध मृदुंग वादक भजन शेत्रातील जाणकार वेक्तिमत्व श्री भार्गव उर्फ भाई महादेव लब्दे वय ८० वर्षे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. भार्गव यांचे मुणगे गावातील कला, क्रीडा, भजन, सामाजिक, संगीत, शेत्रात मोठे योगदान होते. अनेक युवा भजनी बुवा ना घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.भजन शेत्रा मध्ये त्यांचे मोठे नाव जिल्ह्यात होते.हार्मोनियम आणि मृदंग वादन ही त्यांची कला अनेक नवेदित वादकांना प्रेरणा देणारी होती . संगीत क्षेत्रामध्ये भार्गव यांनी अनेक नवोदित कलाकारांना घडविले होते.अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिले होते.त्यांची गायकी ही शास्त्र शुद्ध असायची.अनेक राग ते लीलया गात होते.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावई,नातवंडे, भाऊ, भावजय, पुतणे,पुतणी असा मोठा परिवार असून येथील शांतनु
लब्दे तसेच शुभदा लब्दे, सौ.रुपाली इंगळे, सौ.माधवी बागवे यांचे ते वडील होत.