मृत दोघांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत – मंगेश तळवणेकर
अन्यथा तहसीलदार कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यचा दिला इशारा
सावंतवाडी
शहरात राजवाड्या नजीक भेडले माडाचे झाड पडून अंजीवडे येथील दोन युवकांचा झालेला मृत्यू लक्षात घेता शहरातील धोकादायक झाडे तोडून मृत दोघांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे यासंदर्भात येत्या पंधरा दिवसात सकारात्मक कारवाई व्हावी अन्यथा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 23 ऑक्टोबर रोजी तहसीलदार कार्यालयावर ग्रामस्थांचा भव्य आक्रोश मोर्चा काढावा लागेल असा इशारा माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना दिला आहे.
श्री तळवणेकर यांच्याकडून शहरात घडलेल्या या घटनेनंतर तात्काळ तहसीलदार श्री पाटील यांना निवेदन सादर करून शहरातिल धोकादायक झाडे तोडण्याबाबत सर्वे करण्याची मागणी केली होती तसेच महसूल विभाग बांधकाम विभाग व महावितरण वनविभाग नगरपालिका यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती एकूणच श्री तळवणेकर यांच्या या मागणीची दखल तहसीलदार श्री पाटील यांच्याकडून घेण्यात न आल्याने पुन्हा एकदा तळवणेकर यांनी तहसीलदारांचे लक्ष वेधले आहे. शिवाय येत्या पंधरा दिवसात या संदर्भात कार्यवाही करण्याबरोबरच वृत्त दोन्ही कुटुंबाच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये शासन स्तरावरून मिळवून देण्याबाबत प्रयत्न करण्याचेही म्हटले आहे यासंदर्भात कुठली हालचाल न झाल्यास ग्रामस्थांचा आक्रोश मोर्चा कार्यालयावर आणणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात धोकादायक झाडे असून ती केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे परंतु सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाकडून संदर्भात काहीच कार्यवाही होताना दिसत नाही एकूणच याबाबत तळवणेकर यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांचे लक्ष वेधले होते शहरात पालिकेच्या हद्दीतील झाडांबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची ही झाडे आहेत याबाबत वनविभाग व महसूल विभाग याचे संयुक्त बैठक होणे गरजेचे आहे बैठक घेऊन याबाबत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी ही त्यांनी दिलेल्या निवेदनात केले आहे.