बांदा पोलिसांच्या कारवाईत चेकपोस्टवर ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त
बांदा
गोव्यातून मुंबईकडे केल्या जाणार्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतूकी विरोधात बांदा पोलीसांनी आज पहाटे चेकपोस्टवर कारवाई केली. या कारवाईत २६ लाख २० हजार ८०० रुपयांच्या दारुसह ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी बाबासाहेब बबन यादव (४१, रा. सर्जेपूर, सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमाराला चेकपोस्टवर करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा पोलीस चेकपोस्टवर मुंबईकडे जाणारा टेम्पो तपासणीसाठी थांबविण्यात आला. टेम्पोच्या दर्शनी भागासह मागील बाजूसही नंबर प्लेट नव्हती. त्यामुळे पोलीसांना संशय आला. टेम्पोत स्क्रॅप असल्याचे चालकाने सांगितले. मात्र अधिक तपासणी केली असता त्यात दारुचे बॉक्स आढळून आले.
टेम्पोत रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की ब्रँडचे तब्बल ९१० बॉक्स आढळले. त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत २६ लाख २० हजार ८०० रुपये आहे. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे १० लाख रुपये किमतीचा टेम्पो ताब्यात घेण्यात आला.
सदर कारवाई बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, सुनील पडवळ, हेड काँस्टेबल सिताकांत नाईक, काँस्टेबल राकेश चव्हाण, राजेंद्र बर्गे यांच्या पथकाने केली.
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*