*ज्येष्ठ लेखिका कवयित्री स्वप्नगंधा आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्वास आहे सोबती*
श्वास आहे सोबती,हीच जीवनाची
गती,
कळून सावरून घे रे मानवा तोच संगती,
कोण जरी साथ नसले तरी श्वास
सोबती,
अंतिम क्षणापर्यंत असे आधाराची
शाश्वती.
🌹
आजवर किती आले गेले सखे
सोबती,
परि कुणी न असे जीवनाखेरपर्यंत
सांगाती,
संयम नासोडमनावरचा,नकोश्वास
जलदगती,
कोमलपणे जप त्या श्वासालानको
मंदगती.
🌹
श्वासोच्छ्वास हीच क्रिया आपुली
जागृती,
सर्व सत्कर्मे करता जाणवेसंवेदना
कर्मकृती,
आभाळाएवढ्या मायेने भर तुझी
झोळी ती,
श्वास असे प्राण तुझाअनुभवजाणे
देहगती.
🌹
तुझ्या सत्कृतीने भर श्वास दुसर्या
देहाप्रती,
जीवनाचे सार्थक होई न मने येई विकृती,
सुगंध मनी दरवळू दे प्रेम,मायेची
तू मूर्ती,
वात्सल्य,ममता नित जागो तव
श्वासाप्रती.
💐🌹श्वास तुझी शाश्वती🌹
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
मुंबई विरार