You are currently viewing पोईप गावात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्यावेळी ठाकरे शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने …

पोईप गावात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्यावेळी ठाकरे शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने …

पोईप गावात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्यावेळी ठाकरे शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने …

काही काळ वातावरण तंग;पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्याने परिस्थिती नियंत्रणात…

मालवण

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मालवण तालुक्यात पोईप गावात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्यावेळी आज सायंकाळी ठाकरे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने वातावरण तंग बनले. भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आम्हालाही चर्चेत सामावून घ्या असे सांगितल्याने आक्रमक बनलेल्या आमदार वैभव नाईक यांनी आपण चर्चेसाठी येतो असे सांगत भाषण अर्धवट सोडून चर्चेची सहमती दर्शवित स्टेज वरून खाली उतरल्याने वातावरण अधिकच तापल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यभर केंद्र आणि राज्य शासनाच्या कारभाराचा पंचनामा करण्याच्या दृष्टीने राज्यभर होऊ दे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शिवसेना कामगार नेते गुरुनाथ खोत आणि आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोईप आणि मालवण अशा दोन ठिकाणी येथे होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मालवण तालुक्यात होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचा शुभारंभ पोईप येथे आज सायंकाळी करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते गुरुनाथ खोत जिल्हा समन्वयक प्रदिप बोरकर, महिला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, पंकज वर्दम, बंडू चव्हाण, आशिष परब, सुभाष धुरी, नितीन वाळके, अमित भोगले, प्रज्ञा चव्हाण, सुशांत नाईक आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास शिवसेना आणि पंचक्रोशीतील लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे शिवसेनेला रोखायचे या उद्देशाने विरण येथे जमलेल्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दीड किलोमीटरवर असलेल्या पोईप गावाच्या दिशेने चाल केली. या कार्यक्रमात महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत यांचे प्रारंभीचे भाषण सुरु असतानाच भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. पोईप नाका येथील ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यक्रम स्थळी आल्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत आणि तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भारत माता की जय… राणे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है… पालकमंत्री आगे बढो हम तुम्हारे साथ है… निलेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है….. मोदी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है… अशा जोरदार घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी भाजपचे संदिप परब, राजू परुळेकर, अनिल कांदळकर, दिपक सुर्वे, अजिंक्य पाताडे, महेश मांजरेकर, संतोष गावकर, महेंद्र चव्हाण, चेतन मुसळे, गौरव लुडबे, नारायण लुडबे, राकेश सावंत, दादा नाईक आदी व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केल्यानंतर ठाकरे शिवसेनेने खड्या आवाजात घोषणाबाजी सुरु केली. कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला… वैभव नाईक आगे बढो हम तुम्हारे साथ है…वैभव नाईक अंगार है, बाकी सब भंगार है…. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय असो… या आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत आसमंत दणाणुन सोडला. भाजप व शिवसेना अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरु झाल्याने वातावरण तापले.

या कार्यक्रमात आम्हालाही चर्चा करायची असून आमदारांनी आमच्या समोर चर्चेला यावे अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी लावून धरली. यावर आमदार वैभव नाईक यांनी मी चर्चेला येण्यास तयार आहे. सर्व प्रश्नाची उत्तरे देतो असे सांगितले मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. गुरुनाथ खोत तसेच प्रदिप बोरकर यांच्या भाषणानंतर आम. वैभव नाईक हे भाषण करण्यास उभे राहिले. नाईक हे केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराच्या विरोधात उपस्थितांशी संवाद साधत असताना भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चर्चेसाठी खाली या, असे आव्हान आमदारांना दिले. यावेळी शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी केली. आपण चर्चेला तयार आहोत असे आम. नाईक यांनी सांगितले. मात्र तरीही भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने आम. नाईक यांनी भाषण अर्धवट सोडत व्यासपीठावरून खाली उतरत भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने कूच केली. यामुळे वातावरण चांगलेच तापल्याने पुढील राडा होण्याची शक्यता ओळखून पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मागे हट

प्रतिक्रिया व्यक्त करा