You are currently viewing ॲड. रुजूल पाटणकर यांना ‘EGN इमर्जिंग एज्युकेशन हिरो अवॉर्ड 2023′ पुरस्कार प्रदान

ॲड. रुजूल पाटणकर यांना ‘EGN इमर्जिंग एज्युकेशन हिरो अवॉर्ड 2023′ पुरस्कार प्रदान

ॲड. रुजूल पाटणकर यांना ‘EGN इमर्जिंग एज्युकेशन हिरो अवॉर्ड 2023′ पुरस्कार प्रदान

सावंतवाडी :

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल सावंतवाडीचे उपक्रमशील संचालक तथा आधुनिक शैक्षणिक उपक्रम राबविणारे, युवा संस्थाचालक ॲड. रुजूल पाटणकर यांना यावर्षीचा ‘इमर्जिंग एज्युकेशन हिरो अवॉर्ड 2023’ पुरस्कार प्राप्त झाला आहे

एज्युकेटर एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क (ईजीएन) या आंतरराष्ट्रीय सामाजिक, शैक्षणिक संस्थेतर्फे ॲड. रुजूल पाटणकर यांना 30 सप्टेंबर रोजी मुंबई येथील रेडिसन ब्ल्यू इंटरनॅशनल हॉटेल येथे रंगारंग अवॉर्ड समारंभात हा महत्त्वपूर्ण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ॲड. पाटणकर यांच्या विविध शैक्षणिक प्रयोगांनी प्रभावीत होत EGN या संस्थेमार्फत त्यांच्या मागील आठ वर्षाचा शैक्षणिक प्रवास लक्षात घेता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ॲड. रुजूल पाटणकर यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा