*विश्वकर्मा कौशल सन्मान योजना मेळाव्यात वेंगुर्ले तालुक्यातील बहुसंख्य विविध समाज बांधव उपस्थित रहाणार*
*सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाजाचे जिल्हाध्यक्ष शरद मेस्त्री यांच्या उपस्थितीत नियोजन*
देशातील सुतार , कुंभार , धोबी , नाभिक , मुर्तिकार , शिल्पकार अशा बारा बलुतेदारांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे . देशातील ३० लाख कारागिरांचे नशीब पीएम विश्वकर्मा योजनेमुळे बदलेल . केंद्रीय मंत्रिमंडळाने नविन विश्वकर्मा योजनेला मंजुरी देऊन १३ हजार कोटी ची तरतूद केली आहे. त्यामुळे त्याचा फायदा पारंपरिक कारागिरांना होणार आहे .
विश्वकर्मा योजनेचा उद्देश कौशल प्रशिक्षण , तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य देऊन देशभरातील कारागिर व कारागिरांच्या क्षमता वाढविणे हा आहे.या योजने अंतर्गत कुशल कारागीरांना एम एस एम ई म्हणजेच सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाशी जोडले जाणार आहे . त्यामुळे त्यांना खात्रीची आणि मोठी बाजारपेठ मिळणार आहे .
या योजनेचा फायदा जिल्ह्यातील बारा बलुतेदारांना मिळावा यासाठी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी पुढाकार घेऊन ५ आॅक्टोंबर रोजी शरद कृषी भवन , ओरस येथे विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचा मेळावा आयोजित केला आहे . या मेळाव्याला वेंगुर्ले तालुक्यातील जास्तीत जास्त विविध क्षेत्रातील कारागिर उपस्थित राहण्यासाठी भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाजाचे जिल्हाध्यक्ष शरद मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनवेल फर्नांडीस , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , बुथ प्रमुख बाबुराव मेस्त्री , नांभिक समाजाचे अध्यक्ष किरण पवार , नितीन पवार , महेश मेस्त्री , विलास मेस्त्री , सुजय मेस्त्री , निकेश पवार , राजन पडवळ , अनिल देसाई , सिताराम साटेलकर , प्रसाद पवार , प्रशांत पवार , नारायण मेस्त्री , महादेव मेस्त्री , प्रकाश गांवकर , आनंद दा.मेस्त्री इत्यादी विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते .
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*