स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी:
सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सर्व शिक्षकांनी मिळून महात्मा गांधी यांनी लिहिलेले ‘ वैष्णव जन तो तेने काहिये जे ‘ हे शांतीगीत सादर केले. तसेच, महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची माहिती सादर करण्यात आली. यामध्ये शाळेच्या ग्रंथपाल सौ. अश्विनी पडवळ यांनी महात्मा गांधी यांची राजकीय बाजू व त्याव्यतिरिक्त त्यांचे असलेले पैलू म्हणजेच स्वावलंबन , जीवन शिक्षण म्हणून अंगीकृत करता येतील असे गुण याविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे शिक्षक म्हणून महात्मा गांधी कसे होते व शिक्षकांनी महात्मा गांधी यांनी सांगितलेली कोणती मूल्ये आत्मसात केली पाहिजे, याविषयी सविस्तर माहिती दिली. तर सौ. शाळेच्या सहा. शिक्षिका सौ. ग्रीष्मा सावंत यांनी लाल बहादूर शास्त्री यांची माहिती सादर केली. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. तसेच, शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले.