महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने विविध मागण्यां संदर्भात आमदार नितेश राणे यांची भेट विविध विषय मांडले गेले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत होत असलेल्या सक्तीबाबत तसेच जिल्ह्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत जिल्हा व तालुकास्तर याठिकाणी ठराव घेवून सक्ती केली जात आहे, ही सक्ती शिक्षकांना त्रासदायक होणारी आहे, ही बाब आमदार नितेश राणे यांच्या यांच्या निदर्शनास आणली.
यावर आमदार नितेश राणे यांनी मान.शिक्षणसभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधला. तसेच सर्व जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य यांच्यासोबत चर्चा करून मुख्यालयी राहण्याबाबतच्या सक्तिबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले
तसेच याबरोबरच जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली
आंतरजिल्हा बदलीसाठी १० % रिक्त पदाची अट शिथिल करण्या बाबत
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येऊ नये
सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भाग असल्याने पूर्वीप्रमाणे डोंगरी भागाचे निकष कायम ठेवून मुख्याध्यापक पद १ ते ७ साठी विनाअट मुख्याध्यापक पद देण्यात यावा
ग्रा . पं . १५ व्या वित्त आयोगातून शाळांची वीज बिल भरण्याबाबत
अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना बरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्याबाबत
कोविड १ ९ च्या प्रादुर्भावानंतर शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शाळांचे सॅनिटायझेशन, थर्मल गन, ऑक्सिमिटर, मास्क इत्यादी सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा विकास निधी व जि.प. सेस फंडातून शाळांना निधी देण्यात यावा
पदवीधर प्रमोशन व पदवीधर तसेच उपशिक्षकांची रिक्त पदांची भरती करण्यात यावी
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात यावेत
राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ३० एप्रिल १ ९ ८४ च्या शासन निर्णयानुसार दोन आगाऊ वेतनवाढ देण्याची पद्धत होती . मात्र सदर निर्णय राज्यशासनाने सन २०१३-१४ साली बंद करण्यात येऊन रोख रकम देण्याचा शासन निर्णय करण्यात आला आहे . तरी प्राप्त शिक्षकांच्या मागणीनुसार पूर्वीप्रमाणे दोन आगाऊ वेतनवाड निर्णय करण्यात यावा . तसेच राज्य पुरस्कार शिक्षकांना रेल्वे किंवा बस मोफत पास सवलत कायम स्वरूपी ओळखपत्र तसेच इतर राज्यातील पुरस्कार प्रास शिक्षकांना देण्यात येणान्या सुविधा आपल्या राज्यातील शिक्षकांना राज्यशासनाने देण्यासाठी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे साहेब यांना पत्र देऊन पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली
यावेळी वरील मागण्यांचा पाठपुरावा करून प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन मान. आमदार नितेश राणे यांनी दिले
यावेळी राज्य उपाध्यक्ष दया नाईक, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, महिला आघाडी अध्यक्षा आशा गुणीजन,जिल्हा सरचिटणीस अरुण पवार, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश खांबळकर, जिल्हा मुख्य संघटक रामचंद्र डोईफोडे, जिल्हा प्रतिनिधी रामचंद्र सातवसे, तालुकाध्यक्ष मालवण संतोष कोचरेकर, तालुकाध्यक्ष कणकवली दशरथ शिंगारे, तालुका सरचिटणीस दोडामार्ग सखाराम झोरे, तालुका सरचिटणीस मालवण संतोष परब, देवेंद्र चव्हाण, संजय जाधव, दिनकर शिरवलकर, सागर कुराडे, रामकृष्ण संत्रे उपस्थित होते