दोडामार्ग
कायमच दुसऱ्याच्या हाकेला साद देणारे, दोडामार्गचा “आधारवड” असे ख्याती असलेले तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक, भंडारी समाज तालुकाध्यक्ष, लाकूड व्यापारी संघटना अध्यक्ष तथा सामजिक कार्यकर्ते कृष्णा पालयेकर यांचे रविवारी रात्री एकाच्या सुमारास गोवा-बांबोळी येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
पश्चात पत्नी, मुले असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने दानशूर व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.