You are currently viewing पशुधनातील वाढत्या लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी कन्यांनी केले लसीकरणाचे आयोजन..

पशुधनातील वाढत्या लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी कन्यांनी केले लसीकरणाचे आयोजन..

पशुधनातील वाढत्या लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी कन्यांनी केले लसीकरणाचे आयोजन..

कणकवली

कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी गेल्या दोन वर्षापासून आढळून येणाऱ्या लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डामरे-तिवरे मध्ये लसीकरणाचे आयोजन केले.

हे लसीकरण पशुवैद्य संजय शिरसाट यांनी केले असून त्यामध्ये त्यांना कृषी कन्यांनी मोलाचे सहकार्य केले. हे लसीकरण दि. 28 ऑगस्ट सोमवार या दिवशी घेण्यात आले.

लंपी स्कीन आजारावर Goat pox ( 1 मिली डोस )ही लस

देण्यात आली. यावेळी कृषी कन्यांनी आजाराची लक्षणे व त्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

प्राचार्य. पंकज संते, प्राध्यापक पियुष शिर्के, एस. एस. मोटे व स्वराली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हया लसीकरणाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कृषी कन्या ऐश्वर्या ठाकूर, श्रेया पाटील, श्वेता जाधव, अंकिता चव्हाण, प्रमिता रायपुरे, प्रतिक्षा कोठावळे, प्रिती कांबळे, अदिती कांबळे, गौरी कोरे इ. उपस्थित होते.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा