पुणे :
प्रा. डॉ. एस आर. कुलकर्णी (श्रीपाद कुलकर्णी) यांचे १६-०९-२०२३ रोजी संध्याकाळी ७.३० वा सुमारास पुणे येथील राहत्या घरी वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले.
प्रा.डॉ. एस. आर कुलकर्णी यांचा जन्म मिरज येथे २३ जून १९४९ रोजी झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी गणित या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर त्यांनी गणित विषयांतर PhD देखिल मिळवली. ते सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात उप प्राचार्य होते. तेथून १९९५ साली ते डेक्कन एजुकेशन या नामवंत शिक्षण संस्थेचे ते लाईफ मेंबर होते तसेच वैदिक मॅथेमॅटिक्स या विषयाचा सुद्धा अभ्यास होता आणि त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. पुढे पुण्यातील विश्वविख्यात , ख्यातनाम फर्ग्युसन महाविद्यालयाचे उप प्राचार्य म्हणून ते २००९ साली सेवा निवृत्त झाले.
*या कालावधीत त्यांनी १५० हून अधिक संशोधन पर लेख (Research papers) लिहीले.* *आणि जगातल्या अत्यंत नामांकित अशा प्रकाशनातून ते प्रसिद्ध देखिल झाले.*
*गणित विषयावरील International Conferences मधे सहभागी* *होण्यासाठी ते अनेक वेळा इटली आणि अमेरिकेला जाऊन आले. त्यांनी भारतात बरोबरच Iran, Sudan आणि Iraq इथून आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना देखिल त्यांच्या PhD संशोधनात मार्गदर्शन केले.*
अत्यंत विनम्र, अभ्यासू आणि सर्वतोपरी मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावाने त्यांनी अनेक संस्था आणि तिथल्या सर्वच पदाधिकारी आणि कर्मचार्यांना आपलेसे केले होते.
*त्यांना शास्त्रीय संगीताची विशेष आवड होती. आणि ते उत्तम सतार वाजवत. गेली २० वर्षे ते उस्ताद शाहीद परवेझ या्ंच्याकडे सतारीचा अभ्यास करत होते.*
त्यांच्या मागे त्यांचा सुविद्य पत्नी, डॉ श्रीमती कल्याणी कुलकर्णी, निखिल आणि निरंजन हि दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
श्रीपाद कुलकर्णी सरांना ज्योतिष शास्त्र याची अत्यंत रुची होती. काल परत्वे त्यांनी या शास्त्राचा सखोल अभ्यास चालू केला. ते करत असताना कृष्णमूर्ती पद्धती, हस्तसामुद्रिक, numerology, handwriting analysis, अशा सर्व पद्धतीमध्ये सखोल अभ्यास करून प्राविण्य मिळवले होते.
फर्ग्युसन कॉलेजमध्ये कार्यरत असताना त्यांनी अभिव्यक्ती नावाची एक संस्था चालू केली होती *ज्याच्यामध्ये संगीत नाट्य कला याचे शास्त्रीय अभ्यासक्रम आणि मार्गदर्शन केले जात होते. विविध क्षेत्रातले मान्यवर या संस्थेमध्ये येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आणि हे स्वतः या सर्व कोर्सेसचे पहिले विद्यार्थी असत. 2009 साली सरांनी रिटायर झाल्यानंतर त्यांना इ कोचिंग करण्याची इच्छा होती आणि त्यांनी या गोष्टीचा पूर्ण अभ्यास केला होता. त्यांना त्याची जाणीव होती की काही वर्षांमध्ये शिक्षण हे फक्त वर्गामध्ये सीमित न राहता इंटरनेटवरून त्याचा प्रसार होऊ शकतो. त्याची प्रचिती 2020 साली करोना आल्यानंतर आपणा सर्वांनाच आली. *दोन वाक्य त्यांच्या आयुष्याचा मंत्र होती ती म्हणजे low aim is crime & sky is the limit.*
आपल्याकडे असलेल्या साधनांच्या कमतरतेचा त्यांनी कधी बाऊ केलाच नाही, उलट त्या कमतरतेवरच कायम मात करत आले.
गणित या विषयांमध्ये नोबेल पुरस्कार दिला जात नाही आणि म्हणून तो मला मिळणार नाही ही एक सल त्यांच्या मनामध्ये कायम होती. महत्वाकांक्षेच मृगजळ त्यांना आवडत असे, इतके की एक गोष्ट मिळाली की पुढची दुसरी गोष्ट त्यांना समोर दिसत असे.
अत्यन्त सालस आणि नि:स्पृह असे हे व्यक्तिमत्व होते.
माझा त्यांचा अत्यन्त घनिष्ठ संबंध होता. आमच्या नित्य गाठीभेटी होत असत.
*ते महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या ख्यातनाम साहित्यिक संस्थेचे ते सुरवातीपासून मार्गदर्शक तसेच ज्येष्ठ सल्लागार होते. एक सहृद व्यक्तिमत्व आज समाजातून हरवले आहे याचे मनस्वी दुःख आहे. समस्त महाकवी कालिदास परिवार त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना….!!!*
*संथापक अध्यक्ष , महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे ( महाराष्ट्र ).* *वि.ग.सातपुते.*
*संवाद मिडिया*
😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝
*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨
*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..
🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬
🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨
*सुविधा :*
▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले
▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले
▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा
▪️भूकंपरोधक बांधकाम
▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट
▪️आकर्षक लॉबी
▪️लिफ्टची सोय
▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी
▪️पाण्याची 24 तास सोय
♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*
▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा
▪️अंतर्गत भुयारी गटारे
▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र
👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬
🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563
📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com
🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in
*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*
📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827
*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*