*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*कोण मी*
वार्याची मंद झुळूक की रौद्र झंझावात मी ?
वळीवाचा पाऊस की
श्रावणातली सर मी ?
निरभ्र आकाश की
आकाशाचे तांबडे रक्त मी ?
निरव शांतता की
गर्दीतला एक गोंगाट मी ? जांभळा-गुलाबी वसंत की
पानगळीतली शिशिर मी ?
प्रकाश वेडी पतंग की
स्वयंप्रकाशित काजवा मी ? कोणाच्या डोळ्यांतील प्रतिबिंब की आरशातला मुखवटा मी ?
कोण मी.. कोण मी ?
असा प्रश्न आहे की स्वतःजवळ उत्तर नाही आणि दुसऱ्यांना विचारला तर प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळे…
साहजिकच आहे म्हणा प्रत्येकाचे डोळे वेगवेगळेच आहे ना..
प्रत्येकाच्या डोळ्यांतलं माझं प्रतिबिंब माझ्यापेक्षा बरंच वेगळं… जसा माणूस तसं त्याच्या डोळ्यांतलं माझं प्रतिबिब पण मग नेमकं कोणतं प्रतिबिंब खरं ?
कदाचित कोणतचं नाही..डोळ्यांत दिसणारं ते प्रतिबिंबच.. डोळ्यातल्या पाण्याबरोबर हलणारं, दृष्टीबरोबर धुसर होणारं आणि झापडे बरोबर अदृश्य होणारं.. माणसाचं बाह्यरूप दिसतं प्रतिबिंबात.. मन कधी दिसत नसतं.. बिलोरं मन.. !
अनेक पैलू असलेलं स्वतःला देखील उलगडता येणार नाहीत इतके पैलू मग या मनाचा स्वतःचा शोध घ्यायचा तरी कसा ? माझ्यातली मी कशी शोधायची ? आरसा देईल का या प्रश्नाचं उत्तर ? पण आरशात पाहिलं की मुखवटा दिसतो एक जगासाठी ओढलेला… मोनालिसाच्या चेहऱ्यासारखा मुखवटा…
लोकांना काही गोष्टी गुपित ठेऊन अर्धसत्य दाखवणारा तो मुखवटा तर नकोय दिसायला माझा मला… कोणास ठाऊक “मी” हा शोधून सापडण्यासारखा आहे तरी का ?..
पण एक नक्की की जेंव्हा माझी मी डोळे मिटते तेंव्हा आरशात दिसणारी त्रयस्थ मी आणि डोळ्यांत दिसणारी स्वस्त मी माझ्यातच विरून जाते…!!
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी— ठाणे@
9870451020
*संवाद मिडिया*
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*
*लिंक वर क्लिक करा 👇*
————————————————–
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*
🌐 https://sanwadmedia.com/105547
🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿
👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप
👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇
👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.
🎴 *ओंकार ट्रेडर्स*
*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*
☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१
📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*