मुंबई मेट्रो सेवा पूर्ववत चालू होणार….
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या विळख्यात सापडलेले देशवासीय हळूहळू कोरोनातून मुक्त होत आहेत.
1ते 30 सप्टेंबर पासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरू होत असून या टप्प्यातील सर्व राज्यातील नागरिकांना आणखीन दिलासा मिळणार आहे.केंद्राच्या गाईडलाईन जारी झाल्यानंतर तसे संकेत मिळाले आहेत.
केंद्राच्या गाईडलाईन नुसार पाच महिन्यानंतर मुंबई दिल्लीसह देशातील मेट्रो सेवा असलेले शहरात सात सप्टेंबर पासून मेट्रो सेवा सुरू करण्याची परवानगी दिली गेली आहे. हजारो नोकरदार वर्गांसाठी मेट्रो हे प्रवासाचे मुख्य साधन आहे. सर्वांना मेट्रो पूर्ववत झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.