*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*
*आधुनिक गणेशोत्सव*
स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी समाजातील लोकांमध्ये स्वतंत्र भारतासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली हे आपण सर्वच जाणतो. यासंबंधी असे सांगतात की आपल्याला भारताला स्वातंत्र्यतर मिळवून द्यायचेच आहे,परंतु या कार्यासाठी ईश्वराची सहायता असणेही तितकेच आवश्यक आहे असे टिळकांना सारखे वाटत होते. तेव्हा त्यांनी ह.भ.प.श्रीपतिबुवा भिंगारकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की भाद्रपद शुक्ल चतूर्थीला घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना होते आणि पूजा होते. सर्वांनी मिळून अशी एका गणेशाची स्थापना करून पूजा केली तर त्या निमित्ताने लोक एकत्र येतील, आणि त्या विघ्नहर्त्याची मदतही होईल.
त्यांचा हा सल्ला आदरणीय मानून १८९४ साली टिळकांनी विंचूरकर वाड्यात गजाननाची स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सवाला आरंभ केला.
हा सार्वजनिक गणेशोत्सव आजतागायत चालू आहे,मात्र काळानुरूप त्याचे स्वरूप बदलत चालले आहे.
सार्वजनिक ऊत्सव म्हटला की गणपतीची भव्य मूर्ती, सुंदर सजावट,चलत्चित्रे,आणि गणपतीसमोर होणारे बहारदार करमणुकीचे आणि समाजप्रबोधनाचे कार्यक्रम मला आठवतात.
माझ्या लहानपणी,शालेय,विश्वविद्यालयीन जीवनापर्यंत मी कितीतरी रंगतदार कार्यक्रम या गणपती उत्सवात पाहिल्याचे मला आठवते. शांता आपटे, माणिक वर्मा,भीमसेन जोशी यांना सर्वप्रथम मी गणेशोत्सवात ऐकले आहे.अंमलदार,मोरूची मावशी ही आचार्य अत्रेंची दर्जेदार नाटके सुद्धा या उत्सवातच पाहिली आहेत. चांगली चांगली भाषणे,कथा कथने यांचाही अनुभव या उत्सवांतूनच घेतला आहे.किंबहुना पुढील आयुष्यात या गोष्टींची आवड निर्माण होण्याचे कारण गणेशोत्सवाचा हा अनुभव असे म्हटले तरी वावगे होणार नाही.
माझ्या वडिलांचीही स्वप्न सृष्टीवरील, माणसाच्या आंतर्जीवनावरील कितीतरी व्याख्याने मी या सार्वजनिक गणेशोत्सवांतून ऐकली आहेत.
लोकसंख्या वाढत गेली, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे वाढली,दर्शनाच्या रांगा वाढल्या,लोकांची मानसिकता बदलली,आवडी निवडी बदलल्या.एकूणच सर्व बदलले.
शहराच्या टप्प्याटप्प्यावर रस्ते अडवून
गणपतीसाठी मांडव टाकतात. ट्रॅफिकची कोंडी होते आणि दहा दिवस रोजचे व्यवहार सांभाळताना नागरिक जीवन फारच विस्कळित होते. पण शिवसेनेचा गणपती,भाजपचा गणपती,अमूक मंडळाचा गणपती,तमूक मंडळाचा गणपती,बोलणार कोण? परस्परांत स्पर्धा आणि चुरस.अशावेळी धार्मिक अधिष्ठान, भक्ती, पावित्र्य हरवलेले दिसते आणि मन खिन्न होते. गर्दीच्या ठिकाणी तरूणींची होणारी कुचंबणा पाहून मस्तकाची शीर उठते. समाजातील विकृती सहन होत नाही. सुखकर्त्याच्या,दुःखहर्त्याच्या दर्शनाला जावे, तासंतास रांगेत उभे राहून धक्काबुक्कीत कसेतरी दर्शन घेवून घरी परतावे आणि नंतर शर्टाचा,कुरत्याचा खिसा कापल्याचे लक्षात यावे यासारखी खेदाची दुसरी बाब कोणती?
मोठमोठ्याने सतत चालू असलेली धांगडधिंग्याची गाणी काही काळानंतर ऐकवेनाशी होतात. डी.जे. आणि त्यावर विचित्र अंगविक्षेप करून नाचणारी युवक मंडळी पाहिली की एका पवित्र उत्सवाला काय हे हिडीस रूप प्राप्त झाले म्हणून वाईट वाटते.काही ठिकाणी मंडपात कार्यकारी माणसांचे राजरोज मद्यपान आणि जुगारही चालू असतो. या गोष्टी निश्चितपणे थांबल्याच पाहिजेत असे मला वाटते.
पूर्वीच्या चाळी जाऊन आता मध्यम वर्गीय,उच्चभृ मराठी माणूस सहकारी सोसायटीतून राहू लागला. बहुतांशी प्रत्येक सोसायटीचा सार्वजनिक गणपती उत्सव असतोच. सोसायटीचे सर्व सभासद संध्याकाळी आरतीला जमतात,लहान,मोठी, सर्वच विविध कार्यक्रम बसवितात. लहान मुलांसाठी काही ठिकाणी चित्रकला, नृत्य,गायन फॅन्सी ड्रेस अशा स्पर्धाही ठेवल्या जातात आणि साधारणपणे पाच दिवस मोठ्या आनंदात,उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो.
आमच्या सोसायटीतही पाच दिवस गणपती असतो.मी अमेरिकेत येईपर्यंत सर्व कार्यक्रमात माझा सक्रीय सहभाग असायचा.ढोल ताश्याच्या गजरात गणपतीचे स्वागत करताना आपली ही परंपरा आजही टिकून आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
याठिकाणी मोठ्या अभिमानाने मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे या इथे अमेरिकेतही मराठी मंडळे शनिवार किंवा रविवार असा सुट्टीचा दिवस बघून गणपती साजरा करतात. अगदी पारंपारिक पोषाख घालून आई,वडील आणि त्यांची इंग्लीश बोलणारी मुले लेझीम,झांजा घेऊन खेळत खेळत गणपतीची मिरवणूक काढतात.देवळात किंवा एखाद्या शाळेत गणपती बसवतात. त्या त्या शहरांतील सर्व मराठी जनता उपस्थित असते. नाच,गाणी,एखादे नाटुकले बसवून विविधरंगी कार्यक्रम सादर करतात. परदेशात आपली ही संस्कृती रोवण्याचे काम ही अमेरिकास्थित मराठी मंडळी करतात हे विशेष गौरविण्यासारखे आहे.
*अरूणा मुल्हेरकर*
*मिशिगन*
२४/०९/२०२३
संवाद मिडिया*
*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.
Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*
*COLLEGE CODE-6191*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.
• Duration : 4.5 Years
*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*
*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*