सावंतवाडीत आयोजित गणेश उत्सवाला आज पासून सुरूवात –
केसरकरांच्या हस्ते उद्घाटन
खेळ पैठणी, भजन, ऑर्केस्टा, सेलिब्रेटींची उपस्थिती
सावंतवाडी
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून आणि व्यापार्यांच्या सहकार्याने येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या गणेश उत्सवाला आज पासून सुरूवात झाली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केसरकर यांनी केले. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर चार दिवस हा उत्सव रंगणार आहे. यात खेळ पैठणीचा, भजन, फुगडी आदी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत तर कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मालवणी अभिनेते दिंगबर नाईक उपस्थित राहणार आहेत तर यावेळी प्रसाद हेगीष्टे यांचा स्वरांजली हा ऑर्केस्टाचे आयोजन करण्यात आले आहे.
इंदिरा गांधी व्यापारी संकुल, संत गाडगेबाबा भाजी मंडई राष्ट्रीय एकात्मिक सांस्कृतिक,कला क्रीडा मंडळ आयोजित सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सांस्कृतिक कार्यक्रम शुभारंभ शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा नीता कविटकर सावंत, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, दीपाली सावंत किरण नाटेकर, आबा केसरकर, गजानन नाटेकर, प्रसन्न शिरोडकर, नंदू गावडे, भारती मोरे, पुंडलिक दळवी, राजन श्रुगांरे, निलिमा चलवाडी आदी उपस्थित होते.
यावेळी केसरकर म्हणाले, फुगडी, खेळ पैठणीचा, अभिनेता दिगंबर नाईक, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गणरायाचे आशिर्वाद सर्वांना लाभो. या सभागृहाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. श्री गणरायाचे चरणी भक्तांना लीन होऊन सुख समृद्धी व समाधान मिळो अशी प्रार्थना करतो. यावेळी कलबिंस्त व पावशी फुगडी महिला गृपने सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे
प्रास्ताविक अँड. निता सावंत-कविटकर यांनी केले तर सुत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले .
24