You are currently viewing कणकवली नगरपंचायतला मिळाला बहुमान

कणकवली नगरपंचायतला मिळाला बहुमान

बी पी एम एस सिस्टीम राबवणारी कणकवली जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत

कणकवली :
कणकवली नगरपंचायतमध्ये आता बांधकाम परवानगी भोगवटा प्रमाणपत्र व त्या अनुषंगाने बाबींसाठी नागरिकांना मारावे लागणारे हेलपाटे आता कमी होणार आहेत. ह्या नवीन सिस्टीममुळे या प्रक्रियेत पारदर्शकपणा येणार आहे त्याचसोबत नागरिकांना मारावे लागणारे हेलपाटे वाचणार आहेत. कारण कणकवली नगरपंचायत आता बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम राबवत आहे. ही सिस्टीम राबविणारी कणकवली ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत आहे. Bpms हे ऑनलाइन पोर्टल असून या सिस्टीमच्या माध्यमातून शहराच्या हद्दीत करण्यात येणाऱ्या बांधकामांसाठी परवानगी घेण्यासाठी नगरपंचायतमध्ये हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. या सिस्टीमवर जात बांधकाम परवानगी किंवा भोगवटा प्रमाणपत्रसाठी आवश्यक असणारे कागदपत्र अपलोड करून अर्ज केल्यानंतर ऑनलाइन स्वरूपातच त्याची पूर्तता केली जाणार आहे. आर्किटेककडून या साइटवर बांधकाम परवानगी संदर्भातले कागदपत्र अपलोड करावे लागणार आहेत. या साइटवर ऑनलाइन स्वरूपात हे कागदपत्र अपलोड केल्यानंतर ते नगरपंचायतच्या संबंधित अधिकाऱ्याकडे येणार आहेत. त्यानंतर प्रस्ताव स्विकारणे किंवा नाकारणे ही प्रक्रिया नगरपंचायत कडून करण्यात येणार आहे. नोव्हेंबरपासून कणकवली नगरपंचायतने ही सिस्टीम सुरू केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, सावंतवाडी व वेंगुर्ला या नगरपरिषदांमध्ये यापूर्वी सिस्टीम सुरू होती. मात्र नगरपंचायतमध्ये कणकवली नगरपंचायतने सर्वप्रथम ही सिस्टीम सुरु केली आहे. जनतेचा यासाठी वेळही वाचणार आहे अशी माहिती नगर रचना सहाय्यक मयूर शिंदे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा