You are currently viewing नांदगाव येथे चार चाकीची दुचाकीला धडक!

नांदगाव येथे चार चाकीची दुचाकीला धडक!

नांदगाव येथे चार चाकीची दुचाकीला धडक!

सुदैवाने जिवितहानी टळली ; अपघातात चारजण जखमी

कणकवली :

तालुक्यातील नांदगाव येथे पेट्रोलपंपावर दुचाकीत पेट्रोल भरून निघालेल्या मामा-भाचे व पुतण्या यांना भरधाव कारची धडक बसली. (एमएच ०७ बीयु २१७३) ही गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना नांदगाव येथे आली असता पेट्रोल भरून हायवेवर आलेल्या (एमएच ०७ झेड १९०५) या दुचाकीला चारचाकी क्रमांक (एमएच ०७ बीयु २१७३) ची जोरदार धडक बसली. यात अनिश नारायण इस्वलकर (४० वर्षे, तोंडवली), यश राजकुमार आडिवरेकर (भाचा, १२ वर्षे), साई नितीन इस्वलकर (५ वर्ष), आदित्य नितीन इस्वलकर (३ वर्षे) हे गंभिर जखमी झाले. जखमींना नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी अनिश नारायण इस्वलकर यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. तर त्या तीन मुलांना कणकवलीतील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती मिळाली.

यावेळी अपघातग्रास्तांना रूग्णवाहिका चालक अमोल तेली, सी.आर.चव्हाण यांनी मदतकार्य केले.

एकंदरीत जर पाहिले तर ठिकठिकाणी झालेले पेट्रोलपंप व अनधिकृतरित्या ठेवलेले तेथील मिडलकट हे वाहनचालकांना जीवघेणे ठरत आहेत. नांदगाव येथे अनधिकृत मिडलकटमुळे झालेला हा सहावा अपघात असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. त्यामुळे आतातरी महामार्गप्राधिकरण असे अनधिकृत असलेले मिडलकट बंद करणार की वाहनचालकांना जीवघेणेच ठेवणार असा संतप्त सवाल देखिल तेथे उपस्थित केला जात होता.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा