*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*गौराई आली️*
गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रुप !!
असुरांच्या त्रासाला कटाळून सर्व स्त्रिया गौरीकडे गेल्या .आणि सौभाग्य रक्षणासाठी तिची प्रार्थना केली .त्यानुसार गौरीने असुरांचा संहार केला.आणि शरण आलेल्या स्रियांचे सौभाग्य रक्षण केले.आणि
पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले.तेव्हांपासून महिला
महालक्ष्मी गौरीची पूजा करु लागल्या.
महालक्ष्मीचा हा सोहळा सर्व जाती जमातीत वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
शेतकर्याच्या घरात धान्याच्या राशीला पूजले जाते..
जसे स्थळ तशा पद्धती .काही ठिकाणी मुखवट्याच्या गौरी असतात.कुठे पाणवठ्यावर जाऊन पाच ,सात, अकरा, खडे आणून खड्यांच्या गौरी पूजल्या जातात,
गौरी म्हणजे पार्वती पृथ्वी, वरुणपत्नी ,जाईची वेल असेही मानले जाते.त्यामुळे तेरड्याचीही गौर पूजली जाते.
पद्धती विवीध असल्या तरी मूळ हेतु धान्यलक्ष्मीच्या पूजेचा. भूमी फलीत करण्याचा.
भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन आणि प्रतिष्ठापना होते.ज्येष्ठ नक्षत्रावर तिचे पूजन व भोजन होते.आणि मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन होते….
ही गौराई खरोखरच लाडाची. माहेरवाशीण समजली जाते. ती घाटावरुन येते.घरातल्या लेकीबाळी सुना तिला,भाकरीचा तुकडा ओवाळून,तिचे दूधपाण्याने पाद्यपूजन करुन
ऊंबरठ्यातून आत घेतात. तिला विचारतात,
गौरबाई गौरबाई कुठून आलीस?
“घाटावरुन”
“काय आणलेस?”
“धन धान्य सुख संपती आरोग्य शांती समृद्धी..”
हा गोड संवाद साधत लाडक्या गौराईला हळद कुंकवाच्या पावलांवरुन घरभर फिरवले जाते.
आणि मग तिच्यासाठी खास सजवलेल्या स्थानी तिला
आसनस्थ केले जाते.तेरड्याच्या रोपांवर सजवलेला
मुखवटा आरुढ होतो, भरजरी लुगडं नेसवलं जातं आणि सौभाग्य अलंकाराने तिला सुशोभीत केली जाते.अशी ही गौराई घरभर आनंद चैतन्य उत्साह पसरवते.तिच्यासाठी रेखलेली रांगोळीही रंगारंगातून आनंदाचेच कण उधळवते….
पूजनाच्या दिवशी लाडु करंज्या,शेव ,चकली,लाडु यांची
मांडणी केली जाते ,केळीच्या पानावर सोळा भाज्या एकत्र करुन केलेली भाजी,दिवेफळ,पुरणपोळ्या,पडवळ घालून केलेली कढी चटण्या कोशींबीर वरण भात असा भरगच्च नैवेद्य दाखवला जातो.जयदेवी जयगौरीची
मनोभावे आरती केली जाते. रात्र जागवली जाते.झिम्मा फुगड्या रंगतात.”हिरव्या पानात हिरव्या रानात गौराई नांदूदे..!!अशी गोड गाणी घुमतात.
तिसर्या दिवशी ही गौराई !असे भरगच्च माहेरपण भोगून निरोप घेते.तिच्यासाठी शेवयांची खीर बनवली जाते.
शिवाय सुताच्या गाठीमधून तिला हळद कुंकु फुले ,काशीफळ,बेलफळ दिले जाते.तिचे विसर्जन करताना उदासीनता जाणवते ,पण पुढच्या वर्षी येण्याचं
अश्वासन देउन ती परतते…
स्त्रीतत्वाचा गौरव करणारं हे व्रत आहे…
गौराई माझी धनलक्ष्मी
गौराई माझी धान्यलक्ष्मी
गौराई देते ग्वाही सुफलतेची
गौराई देवी सक्षमतेची….
सौ. राधिका भांडारकर पुणे.
————————————————————
*संवाद मिडिया*
😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝
*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨
*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..
🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬
🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨
*सुविधा :*
▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले
▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले
▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा
▪️भूकंपरोधक बांधकाम
▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट
▪️आकर्षक लॉबी
▪️लिफ्टची सोय
▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी
▪️पाण्याची 24 तास सोय
♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*
▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा
▪️अंतर्गत भुयारी गटारे
▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र
👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬
🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563
📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com
🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in
*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*
📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827
*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*