मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय प्रदेश प्रतिनिधी पदी उमेश येवले यांची निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष मा. आमदार जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक रविंद्र पवार, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष राखीताई जाधव, राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दिकी तसेच जिल्हा अध्यक्ष रुपेश खांडगे उपस्थित होते.