You are currently viewing महानोर यांना साहित्य अभिवाचनातून अभिवादन

महानोर यांना साहित्य अभिवाचनातून अभिवादन

*महानोर यांना साहित्य अभिवाचनातून अभिवादन*

पिंपरी

रानकवी ना. धों. महानोर यांना त्यांच्याच ‘अजिंठा’ या अभिजात साहित्यकृतीचे अभिवाचन करून रुद्रंग, निगडी – पुणे या संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पैस रंगमच, प्रीमियर प्लाझा, मुंबई – पुणे हमरस्ता, चिंचवड येथे रविवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना आणि दिग्दर्शन रमेश वाकनीस यांचे होते; तर अजिज सय्यद यांनी या संहितेला संगीतबद्ध केले होते. किशोरी सरीन यांनी अतिशय सुरेल आवाजात यामधील गीतांचे सादरीकरण केले. अशोक अडावदकर, अभय बिलुरकर, अरुणा वाकनीस, अजिज सय्यद आणि रमेश वाकनीस यांचा वाचकस्वर अभिवाचनासाठी लाभला. ब्रिटिश मेजर रॉबर्ट गिल आणि बंजारा समाजातील पारू यांच्या अजिंठ्यातील भव्य शिल्पांच्या साक्षीने घडलेल्या शोकात्म प्रेमकथेचा काव्यात्म शैलीतील आविष्कार उत्तरोत्तर इतका उत्कट पातळीवर पोहोचला की, नकळत रसिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

ना. धों. काव्याभिवाचन या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पिंपरी – चिंचवड परिसरातील पीतांबर लोहार, माधुरी विधाटे, प्रदीप गांधलीकर, अर्चना भांडारकर, अभय बिलुरकर, मोनिका बागडे या कवींनी प्रत्येकी महानोर यांची एक आणि स्वतःची एक अशा कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. रंगकर्मी प्रभाकर पवार यांची विशेष उपस्थिती यावेळी लाभली होती. त्यांनी महानोर यांचा काळी माती अन् रानाशी असलेला अनुबंध उलगडून सांगताना ‘या नभाने या भुईला दान द्यावे…” या कवितेचे अभिवाचन केले.

शशिधर बडवे, प्रियांका आचार्य, अनिरुद्ध गोसावी, माधुरी ओक, नंदकुमार कांबळे, नंदकुमार मुरडे यांनी संयोजनात सहकार्य केले. मानसी चिटणीस यांनी कविसंमेलनाचे आणि उज्ज्वला केळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सागर यादव यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा