You are currently viewing मालवण नगरपरिषदेच्या ‘स्वच्छता पंधरवडा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण नगरपरिषदेच्या ‘स्वच्छता पंधरवडा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण नगरपरिषदेच्या ‘स्वच्छता पंधरवडा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची प्रमुख उपस्थिती

मालवण

स्वच्छ मालवण शहरसाठी नगरपरिषदेने १७ ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता पंधरवडा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. मालवण शहराला चिवला ते दांडीपर्यंतचां किनारा शालेय विद्यार्थी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, विविध सेवाभावी संस्था आणि मच्छिमार बांधवांच्या सहभागातून स्वच्छ करण्यात आला. शहरातील राजकोट, दांडी,आवार, मालवण बंदर समुद्रकिनाऱ्यापर्यंत युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मालवण नगरपरिषद नेव्हीगेटर्स संघाने दमदार सुरवात केली आहे.

यावेळी जिल्हाधिकारी, किशोर तावडे, नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सुभेदार मेजर गेडाम, आर्मी आफीसर मंहिदर लाल व शिवशंकर, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, मत्स्य विभाग अधिकारी तेजस्वीता करंगुटकर, मेरी टाईम बोर्ड कर्मचारी, विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी, मालवण नगरपरिषद कर्मचारी, मालवण माजी नगरसेवक दिपक पाटकर, डॉ राहुल पंतवालावलकर, सौरभ ताम्हणकर यासह अन्य उपस्थित होते.

यावेळी नगरपरिषद कर्मचा-यांकडून राज्यगीत सादरीकरणाने कार्यक्रमास वंदना देण्यात आली

“मेरी माटी मेरा देश” या केंद्र शासनाच्या अभियानाअंतर्गत प्रंचप्रण शपथ उपस्थित सर्व मान्यवर व नागरीक, विदयार्थी यांच्या समवेत घेऊन भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प घेण्यात आला. इंडियन स्वच्छता लिग 2.0 सागरी किनारा स्वच्छता मोहिमे केवळ स्वच्छतेपुर्तीच मर्यादित न ठेवता नगरपालिकेने नियोजनबध्द विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये “योग ज्योती मालवण” महिलांचा योगा कार्यक्रम, नगरपरिषद कर्मचारी यांचे मार्फत “सप्तसूर स्वच्छतेचे” पथनाटय, कलांकूर ग्रुप यांच्यामार्फत “हम होंगे कामयाब” फ्लॅश मॉब इत्यादी विविध स्वच्छतेचे संदेश देणारे कार्यक्रम पार पडले.

“माझी माती माझा देश” अभियानातील अमृत कलश यात्रेत मालवण शहरातील विविध प्रभागातील पवित्र माती गोळा करण्यात आलेली होती. सदर अमृत कलशामध्ये जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी मालवण बंदर जेटी येथील माती अर्पण केली. सागरी किनारा स्वच्छता मोहिमेमध्ये वेगवेगळया टिम मध्ये मेढा- राजकोट, मच्छीमार्केट पर्यंतचा किनारा स्वच्छ करण्यात आला. या सागरी स्वच्छता मोहिमेध्ये सुमारे 1.5 टन कचरा गोळा करण्यात आला.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा