You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा..

पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा..

सिंधुदुर्गनगरी 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे शनिवार दिनांक 28 नोव्हेंबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            शनिवार दिनांक 28 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 7.54 वा. मुंबई – मडगांव एक्सप्रेसने ओरोस, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय विश्रामगृह, ओरोस कडे प्रयाण, सकाळी 8.15 वा. सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वा. डी.पी.डी.सी. नवीन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम व कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात आढावा बैठक, सकाळी 10.30 वा.  डी.पी.डी.सी.च्या नवीन सभागृहात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्या समवेत निःसमर्थ व्यक्तींसाठी जि.प.सेस 5 टक्के निधीचे नियंत्रण करण्याकरिता जिल्हास्तरीय समिती सभा, सकाळी 11.00 वा. डी.पी.डी.सी.च्या नवीन सभागृहात विभागीय आयुक्त कोकण विभाग, अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, उपविभागीय अधिकारी कणकवली, कुडाळ, जिल्हा भूमी अधिक्षक यांच्या समवेत मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 बाबत आढावा बैठक, सकाळी 11.30 वा. शरद कृषि भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना कार्यकारिणी बैठक, दुपारी 2.00 ते 3.00 राखीव. दुपारी 3.00 वा. शरद कृषि भवन, सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार परिषद, सायं. 4.00 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे महाविकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय समिती बैठक, सायं. 5.30 वा. सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने मालवणकडे प्रयाण, सायं. 6.00 वा. मालवण नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, सोई नुसार मालवण येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा