You are currently viewing दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त आ. वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ,मालवण वासियांना पूजेच्या साहित्याची छोटीशी भेट

दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त आ. वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ,मालवण वासियांना पूजेच्या साहित्याची छोटीशी भेट

*दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त आ. वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ,मालवण वासियांना पूजेच्या साहित्याची छोटीशी भेट*

*आ. वैभव नाईक यांच्या ११ वर्षाच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक*

कोकणात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जातो.घरोघरी श्री. गणेशाचे विधिवत पूजन केले जाते. गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण वासियांना श्री. गणेश पूजेच्या साहित्याची छोटीशी भेट यावर्षीही दिली आहे.जनतेवर असलेल्या प्रेमाच्या रूपाने आणि श्री. गणेशाच्या श्रद्धेने पूजेच्या साहित्याची छोटीशी भेट जनतेपर्यंत पोहिचविण्याचा आ.वैभव नाईक यांचा प्रयत्न असतो.
फक्त आ. वैभव नाईक नाही तर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तळमळीने कुडाळ मालवण मतदारसंघातील ७५ हजार घरांपर्यंत हि भेट पोहचविण्याचे काम करतात. गेल्या तीन चार वर्षांपासून लहान मुले- मुली देखील आवडीने यात सहभागी होऊन मदत करतात. आ.वैभव नाईक यांच्याकडून गेली ११ वर्षे हि पूजेच्या साहित्याची भेट मतदारसंघात दिली जात आहे. नागरिक आवडीने हि भेट स्वीकारून आ. वैभव नाईक यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा