मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आशिया चषक २०२३ मधील सुपर फोर फेरीतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. बांगलादेशने भारताचा सहा धावांनी पराभव केला. सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात भारताचा हा पहिलाच पराभव आहे. स्पर्धेच्या दृष्टिकोनातून या सामन्याचे महत्त्व नव्हते आणि टीम इंडिया १७ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. त्याचवेळी या विजयासह बांगलादेशचा प्रवास संपला.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने आठ गडी गमावून २६५ धावा केल्या. कर्णधार शकीब अल हसनने सर्वाधिक ८० धावांचे योगदान दिले. तौहीद हृदयॉयने ५४ आणि नसूम अहमदने ४४ धावा केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने तीन आणि मोहम्मद शमीने दोन बळी घेतले. प्रसिद्ध, अक्षर आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
२६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ सर्व गडी गमावून २५९ धावाच करू शकला. शुभमन गिलने १२१ धावांची शानदार खेळी केली, पण त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. ४२ धावा करणारा अक्षर दुसरा सर्वोत्तम धावा करणारा ठरला. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमानने तीन बळी घेतले. महेदी हसन आणि तनझिम हसन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शाकिब आणि मेहदीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारतीय संघ व्यवस्थापनाने अंतिम अकरामध्ये पाच बदल केले. विराट कोहली, कुलदीप, बुमराह, मोहम्मद सिराज आणि हार्दिक यांच्या जागा तिलक, श्रेयस, सूर्यकुमार, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णाला खेळवले. तिलक वर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर २० वर्षीय तनझिम हसन शाकिबने बांगलादेशसाठी पहिला एकदिवसीय सामना खेळला.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आशिया चषकातून आधीच बाहेर पडलेल्या बांगलादेशने चार गडी गमावून ५९ धावा केल्या होत्या पण शकीब आणि तौहीदने डाव सांभाळला. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलच्या चेंडूवर शकीबने सलग दोन षटकार ठोकले. कर्णधार शकीब अल हसन (८०) आणि तौहीद हृदयॉय (५४) यांच्या बळावर बांगलादेशने शुक्रवारी एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-४ सामन्यात भारताविरुद्ध आठ गडी गमावून २६५ धावा केल्या. शकीबने ८५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकार मारले, तर तौहीदने ८१ चेंडूत ५४ धावा करत कर्णधाराला चांगली साथ दिली. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी झाली. नसूम अहमद (४४) आणि मेहदी हसन (नाबाद २९) यांनीही उपयुक्त योगदान दिले. अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीने नव्या चेंडूवर चांगली कामगिरी केली. त्याने तिसऱ्या षटकात लिटन दासला त्रिफळाचीत केले. याशिवाय ६५ धावांत तीन बळी घेणार्या शार्दुल ठाकूरने धावांची उधळण केली मात्र जास्तीची विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला. मात्र, भारतीय क्षेत्ररक्षक सूर्यकुमार, तिलक आणि केएल राहुल यांनी तीन झेल सोडले नसते, तर बांगलादेशला २०० धावांच्या आत गुंडाळता आले असते.
२६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा खाते न उघडता तनझिम हसनचा बळी ठरला. त्याच्या पुढच्याच षटकात तनझिमने तिलक वर्मालाही कारकिर्दीतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाच धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. १७ धावांवर दोन गडी गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. राहुलने गिलसोबत अर्धशतकी भागीदारी करत भारतीय डाव सावरला, पण महेदी हसनने त्याला १९ धावांवर तंबूमध्ये पाठवले. इशान किशनही पाच धावा काढून मेहदी हसनचा बळी ठरला. दरम्यान, गिलने ६१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताच्या ९४ धावांत चार विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार आणि गिल यांनी भागीदारी करत भारताची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली आणि आशा उंचावल्या, मात्र २ धावांवर शकिबने सूर्यांच्या यष्ट्या उध्वस्त केल्या आणि टीम इंडिया अडचणीत आली.
भारताचा निम्मा संघ १३९ धावांवर तंबूमध्ये परतल्यामुळे भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी गिलवर आली. त्याने वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली आणि भारताची धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली. मात्र, यादरम्यान जडेजा सात धावा करून बाद झाला. गिलने ११७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यानंतर त्याने वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली आणि भारतीय संघ सामन्यात परतला. गिल आणि अक्षर यांनी मिळून भारताची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली. मात्र, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात गिलने त्याची विकेट महेदी हसनकडे सोपवली. त्याने १३३ चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने १२१ धावा केल्या. त्याचे हे आशिया चषक स्पर्धेतले पहिले शतक ठरले. २०२३ मधले गिलचे हे सहावे शतक आहे. त्याचवेळी भारताकडून यंदाच्या वर्षी एक हजार धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला.
दरम्यान, अक्षरने वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. दरम्यान शार्दुल ११ धावा करून बाद झाला. अक्षरने मोठे फटके खेळत भारताची धावसंख्या २५० धावांच्या पुढे नेली. मात्र, तो ४९व्या षटकात ३४ चेंडूत ४२ धावा काढून बाद झाला. त्यामुळे भारताचा पराभव निश्चित झाला. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर शमी धावबाद झाला आणि एक चेंडू शिल्लक असताना भारतीय डाव २५९ धावांवर आटोपला.
अष्टपैलू रवींद्र जडेजा हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हजारपेक्षा अधिक धावा करणारा आणि २०० पेक्षा अधिक बळी घेणारा भारताचा दुसरा आणि जगातील १४ वा क्रिकेटपटू ठरला. जडेजाने आपला १८२ वा सामना खेळत बांगलादेशविरुद्धच्या आशिया चषकाच्या सामन्यात शमीम हुसेनला बाद करून एकदिवसीय क्रिकेटमधील २०० बळी पूर्ण केले. क्रिकेटच्या या प्रकारामध्ये त्याच्या नावावर २५७८ धावा आहेत. जडेजापूर्वी भारताचे महान अष्टपैलू कपिल देव यांनी ही कामगिरी केली होती. २२५ सामन्यात ३७८३ धावा करण्यासोबतच त्यांनी २५३ विकेट्सही घेतल्या होत्या.
एकदिवसीय सामन्यात २०० विकेट घेणारा जडेजा सातवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापुढे अनिल कुंबळे (३३४ बळी), जवागल श्रीनाथ (३१५), अजित आगरकर (२८८), झहीर खान (२६९), हरभजन सिंग (२६५) आणि कपिल देव (२५३) आहेत.
बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर ठरला.
*संवाद मिडिया*
👩👩👧👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
*Advt Link👇*
————————————————–
📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝
👩👩👧👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻💻
(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑
👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत
⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*
👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)
*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी
📱 *संपर्क:*
सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132
सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*