जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला इशारा
वैभववाडी
वाभवे – वैभववाडी नगरपंचायत आमदार नितेश राणे यांच्या या विचारांची होती. गेल्या 5 वर्षात शासनाने कोट्यावधी रुपये इतका निधी या नगरपंचायतीला दिला. तरी वैभववाडी नगर पंचायतीच्या हद्दीतील जनतेला मूलभूत सुविधा अद्याप मिळालेल्या नाहीत. गेल्या ५ वर्षातील नगर पंचायतीने केलेल्या कामांचा पंचनामा येत्या काही दिवसात शिवसेना करणार, असा इशारा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, वैभववाडी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी जिल्हा परिषद सभापती संदेश सावंत पटेल, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, माजी सभापती रमेश तावडे, संभाजी रावराणे, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, शहर प्रमुख प्रदीप रावराणे व अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. पुढे सावंत म्हणाले, वैभववाडी शहराचा विकास करण्यासाठी वैभववाडी नगर पंचायत पाच वर्षेसाठी माझ्या ताब्यात दया, असे आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी शहरातील जनतेला आश्वासन दिले होते. जनतेने.पाच वर्षे दिली. पाचवर्षे पूर्ण झाली तरी वैभववाडीतील रस्ते, वीज, पाणी या मूलभूत गरजा अद्यापही प्रलंबित राहिल्या आहेत. पाच वर्षांमध्ये वैभववाडी नगरपंचायतीचे सत्ताधारी नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च केला, मात्र ती कामे प्रत्यक्ष झालेली दिसतच नाहीत.काही कामे अपूर्ण आहेत.त्या पाच वर्षातील सर्व विकास कामांचा पंचनामा शिवसेना येत्या काही दिवसात करणार आहे. गेले 5 वर्षात वैभववाडी वासीयांना सत्ताधारी नगर सेवक पिण्याचे पाणी देऊ शकले नाहीत. माजी पालकमंत्री तथा आ. दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन मधून वैभववाडी नगर पंचायतीला भरीव असा कोट्यावधीचा निधी दिला. तो निधी आ. नितेश राणे यांच्या नगरसेवकांनी कामे निकृष्ठ दर्जाची केली. नगरपंचायत हे सत्ताधारी नगर सेवकांचे पैसे मिळवीण्याचे कुरण केले आ.दीपक केसरकर यांनी 38 लाख रुपये इतका निधी कचरा प्रक्रिया करण्यासाठी दिले होते.त्याचा ठेका आमदार नितेश राणे यांच्या मर्जीतील पूणे येथील एका ठेकेदाराला दिला आहे. भरघोस निधी माजी पालकमंत्री केसरकर यांनी दिला. मात्र त्याचा विनियोग झालेला नाही. वैभववाडी शहरातील जनता सत्ताधारी नगरसेवकांना कंटाळली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी चे नेते मंडळी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. आम्ही जी घोषणा देऊ ती पूर्ण करू असे आश्वासन सावंत यांनी दिले. महाविकास आघाडी सरकारने आचरा, कनेडी, फोंडा, उंबर्डे या राज्य मार्गासाठी 4 कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. गेले 9 महीने कोविड च्या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रिया बंद होती. वैभववाडी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन रस्त्याच्या निविदा प्रक्रिया सुरू केल्या आहेत. वैभववाडी भाजपाने 26 नोव्हेंबर रोजी तहसीलदार कार्यालया समोर ठिय्या आंदोलन हे आंदोलन ही भाजपाने नौटंकी केली आहे.त्यांच्या नौटंकीला शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा आहेत, असा उपरोक्त टोला लगावला.