You are currently viewing गणेशोत्सव काळात पोलीस दलाकडून करण्यात आलेले नियोजन

गणेशोत्सव काळात पोलीस दलाकडून करण्यात आलेले नियोजन

गणेशोत्सव काळात पोलीस दलाकडून करण्यात आलेले नियोजन

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात दि. 19 सप्टेंबर 2023 रोजी पासून सार्वजनिक मंडळे तसेच घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 31 सार्वजनिक व 71789 खाजगी गणपतीचे पूजन होणार आहे.गणेशोत्सव कालावधीत घरोघरी, तसेच सार्वजनिक मंडळांचे वतीन गणेश मुर्तीचे पूजन करून त्याची दिड, पाच, सात, नऊ, अनंत चतुर्दशी, अकरा, सतरा, एकवीस दिवस मनोभावे पूजा करुन, भजन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन गणेश उत्सव उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवाकरीता मुंबई, पुणे तसेच इतर जिल्ह्यामधून नोकरवर्ग व कुटुंबिय खाजगी वाहनाने, तसेच बसेस, रेल्वेने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आपले मूळ गावी येतात. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेस्टेशन, बस स्टैण्ड येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तसेच गणेश उत्सवाकरीता सामान खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गणेशोत्सव शांततेत व सुरळीत भक्तीमय वातावरणात पार पडावा याकरीता पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

गणेश उत्सवाकरीता बाहेरुन येणाऱ्या चाकरमान्यांना, नागरीकांना वाहतूकीबाबत कोणत्याही अडचणी येवू नयेत, वाहतूकीची कोंडी होवू नये, प्रवास सुखकर व सुरळीत व्हावा याकरीता सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 9 राहुट्या फिक्स पॉईन्ट, मोटार सायकल/जीप पेट्रोलिंग दिवसा व रात्रौ नेमण्यात आलेले आहेत.

शासनाने गणेशोत्सव काळात अवजड वाहतूकीबाबत निर्बंध घातलेले असून त्याप्रमाणे अवजड वाहतूकीचे नियोजन व शासनाचे आदेशाची अंमलबजावणी करण्याकरीता बांदा-पत्रादेवी चेकपोस्ट येथे दिवसा व रात्रौ पोलीस व वाहतूक बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरीकांना मदत व सुविधा मिळावी याकरीता तात्पुरत्या स्वरुपात राष्ट्रीय महामार्गावर 3 ठिकाणी नागरी सुविधा केंद्र उभारण्यात आलेली असून त्याठिकाणीही पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.

बाजारपेठांमध्ये भाविकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून त्याठिकाणी वाहतूक नियोजनाकरीता पोलीस ठाणे स्तरावर वाहतूक बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.

गर्दीचा फायदा घेवून पाकिटमारी, चोरी वगैरेसारखा प्रकार घडू नये याकरीता रेल्वेस्टेशन, बसस्टॅण्ड, बाजारपेठांचे ठिकाणी पेट्रोलिंग, फिक्स पॉईंट नेमण्यात आलेले आहेत.

गणेशोत्सवाकरीता येणाऱ्या गणेश भक्तांना सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येते की, खाजगी वाहनाने प्रवासा दरम्याने वाहतूकीचे सर्व नियम पाळावेत. वाहने पार्किंग करताना वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्वतःची कुटुंबियांची व मुलांची काळजी घ्यावी. वाहने भरधाव चालवू नयेत.

रेल्वे, बसने प्रवास करणाऱ्या, तसेच बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी भाविकांनी आपल्या सामानाची, दाग- दागिने व किंमती वस्तूंची काळजी घ्यावी. बसस्टॅण्ड, रेल्वे स्टेशनवर काही अडचणी आल्यास तेथे बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या पोलीसांशी संपर्क करावा. आपल्या वस्तू चोरीला जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

दि.28 सप्टेंबर 2023 रोजी अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत. पोलीस दलातर्फे सर्व नागरीकांना विनंती करण्यात येते की, आपले सण भक्तीमय वातावरणात साजरे करावेत. आपल्यामुळे दुसऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.

गणेशोत्सव शांततेत, सुरळीत व भक्तीमय वातावरणात पार पडावा याकरीता सिंधुदुर्ग पोलीस दलाचे वतीने 47 पोलीस अधिकारी, 197 पोलीस अंमलदार, महामार्ग सुरक्षा केंद्राचे 4 अधिकारी व 50 अंमलदार, 2- दंगल नियंत्रण पथके व 350 होमगार्ड असा बंदोबस्त दिवसा व रात्रौकरीता नेमण्यात आलेला आहे.

आगामी साजरे होणाऱ्या गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या सर्वांना पोलीस दलाचे वतीने शुभेच्छा देत आहोत. सण शांततेत, सुरळीत व भक्तीमय वातावरणात पार पडावेत याकरीता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात येत आहे.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा