‘सिंधुदुर्ग लाईव्ह’ वृत्तवाहिनीचे चे एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड कोव्हीड योध्दा २०२०’ प्रदान करण्यात आला. कोरोनासारख्या महामारीत लॉकडाऊन काळात गोरगरीब मजूर, असहाय्य परप्रांतीयांना अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या चित्रपट श्रुष्टीतील कलाकार, मिडिया क्षेत्रातील संपादक, पत्रकार, संशोधक, एनजीओ आदी क्षेत्रातील व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार बहाल करुन सन्मानित करण्यात आल. आज या पुरस्काराच वितरण मुंबईतील अंधेरी (पूर्व) येथील हॉटेल पेनीन्सूला इथं मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाच आयोजन दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्मकडुन कल्याणजी जाणा यांनी केलं होत. कोव्हीडच्या या काळात एक क्षणही न थांबता अखंडपणे केलेल्या या सर्व उपक्रमांची, सिंधुदुर्ग लाईव्हच्या कार्याची दखल राज्यस्तरावर काम करणाऱ्या दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्मसकडून घेण्यात आली होती.या उल्लेखनीय कार्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हचे एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड कोव्हीड योध्दा २०२०’ हा मानाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या मानाच्या पुरस्कारामुळे सिंधुदुर्ग लाईव्हचं विशेष करुन सागर चव्हाण यांच सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.