You are currently viewing गणेश चतुर्थीचे औचित्य साधत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून तब्बल 10 हजार कमळ फुलांचे होणार वाटप

गणेश चतुर्थीचे औचित्य साधत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून तब्बल 10 हजार कमळ फुलांचे होणार वाटप

गणेश चतुर्थीचे औचित्य साधत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून तब्बल 10 हजार कमळ फुलांचे होणार वाटप

18 सप्टेंबर रोजी कणकवली पटवर्धन चौकात होणार शुभारंभ

कणकवली

खास गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कणकवलीचे माजी नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून गणेश चतुर्थीचे औचित्य साधून प्रत्येकी 2 याप्रमाणे कमळ फुलाचे वाटप 18 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता कणकवली पटवर्धन चौकात करण्यात येणार आहे. श्री. नलावडे यांच्या माध्यमातून अशा अनोख्या पद्धतीने हा उपक्रम राबवला जात असून, भाजपची कमळ ही निशाणी कमळ फुलाच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठीचा हा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा अनोखा उपक्रम सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कणकवली पटवर्धन चौक या ठिकाणी सकाळी 9.30 वाजल्यापासून या कमळ फुलांचे वाटप होणार आहे. प्रत्येक गणेश भक्ताला 2 याप्रमाणे तब्बल 10 हजार कमळ फुले वाटप केली जाणार आहेत अशी माहिती श्री नलावडे यांनी दिली. जेणेकरून या माध्यमातून गणेशोत्सव कालावधीमध्ये गणपतीला वाहण्यासाठी लोकांना कमळ फुल मिळावे व यातून भाजपा पक्षाची निशाणी तब्बल 5 हजार लोकांपर्यंत घराघरात पोहोचली जावी हा त्यामागील उद्देश आहे.असेही श्री नलावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा