शालेय जिल्हास्तरीय बुदधिबळ व कॅरम स्पर्धा
क्रीडा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे कनेडी विदयामंदिर, कणकवली येथे जिल्हास्तरीय शालेय बुदधिबळ आणि कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुक्ताई ॲकेडमीच्या जिल्हाभरातील बावीस विदयार्थी, विदयार्थिनींनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.यावर्षी जिल्हा बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
ॲकेडमीची राष्ट्रीय कॅरम खेळाडू कु.साक्षी रमेश रामदुरकर आणि राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू कु.विभव विरेश राऊळ यांनी मागील वर्षाप्रमाणेच या वर्षी देखील चौदा वर्षाखालील गटात निर्विवाद वर्चस्व ठेऊन प्रथम क्रमांक पटकावला.राज्यस्तरीय कॅरम खेळाडू कु.क्षितीजा मुंबरकर, बुदधिबळ खेळाडू कु.राजेश विरनोडकर यांच्यासोबत अकरा विदयार्थी, विदयार्थिनींनी जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवले.या सर्व विदयार्थ्यांची विभाग स्तरावर निवड करण्यात आली.सर्व विदयार्थ्यांना श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विदयार्थ्यांचे युवराज लखमराजे, राणी सरकार शुभदादेवी आणि राजे सरकार बाळराजे यांनी कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी मुला – मुलींसाठी गणेश चतुर्थीपासून कॅरम, बुदधिबळ, अभिनय, नृत्य, इत्यादी उपक्रमांच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. सहभाग घेण्यासाठी 8007382783 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.