मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आपल्या कलाकृतीला कौतुकाची थाप मिळावी असं सगळ्याच कलाकारांना वाटतं. चांगल्या गुणवत्तेची दखल घेत ‘फक्त मराठी सिने सन्मान’ या पुरस्कार सोहळ्याने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि त्याला आज व्यापक आणि भव्य स्वरूप प्राप्त झालं आहे. मराठी चित्रपटात सातत्याने चांगल्या चित्रपटांची निर्मिती होत आहे, याची दखल घेत यंदाही ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२३’ या पुरस्कार सोहळ्यासाठी उत्तमोत्तम चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. हा सन्मान केवळ कलाकारांपुरता मर्यादित नसून मराठी मनोरंजनसृष्टीसाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या कलाकार आणि पडद्यामागे असलेल्या तंत्रज्ञाचा हा सन्मान सोहळा आहे. या पुरस्कार सोहळ्यातील नामांकनांपासून पुरस्कार वितरणापर्यंत सर्वच गोष्टी नाविन्याने नटलेल्या असतात. नुकतीच पारितोषिकांसाठीची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. गेल्या वर्षापासून आयोजित होत असलेल्या या सोहळ्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. येत्या १५ सप्टेंबरला यंदाचा ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२३’ सोहळा रंगणार आहे.
कलेच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या आणि मराठी चित्रपटसृष्टी बहरावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणे, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असून हा कौतुक सोहळा कलाकारांना अजून चांगलं काम करण्याची ऊर्जा देईल, असा विश्वास फक्त मराठी वाहिनीच्या हेड पल्लवी मळेकर यांनी व्यक्त केला.
चित्रपटसृष्टीसाठी मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२३’ पुरस्कारांमध्ये यंदा ‘अनन्या’, ‘घर बंदूक बिर्याणी’, ‘वाळवी’, ‘सरला एक कोटी’, ‘वेड’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटांमध्ये चुरस रंगणार आहे. घोषित करण्यात आलेल्या या नामांकनातून आता कोणाला कौल मिळणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नामांकन मिळविलेल्या गौरवार्थींची नावे खालीलप्रमाणे:-
सर्वोत्कृष्ट गीतकार – जितेंद्र जोशी, गुरू ठाकूर, अजय अतुल, वैभव देशमुख, अभिषेक खणकर
सर्वोत्कृष्ट संगीतकार – अजय-अतुल, अमितराज, ए व्ही प्रफुलचंद्र, समीर साप्तीस्कर, विजय नारायण गवंडे
सर्वोत्कृष्ट गायिका – वैशाली माडे, आर्या आंबेकर, श्रेया घोषाल, आनंदी जोशी, श्रेया घोषाल, मुग्धा कऱ्हाडे
सर्वोत्कृष्ट गायक – विशाल दादलानी, स्वप्नील बांदोडकर, जयेश खरे, आदर्श शिंदे, श्रेयस पुराणिक, अजय गोगावले
सर्वोत्कृष्ट पटकथा – नागराज मंजुळे – हेमंत अवताडे, शंतनू गणेश रोडे, मधुगंधा कुलकर्णी – परेश मोकाशी, प्रताप माधवराव फड, ऋषिकेश तुराई – संदीप पाटील – रितेश देशमुख, मच्छिंद्र बुगडे – चंद्रकांत कणसे
सर्वोत्कृष्ट कथा – नितीन सिंधुविजय सुपेकर, प्रताप माधवराव फड, शंतनू गणेश रोडे, मधुगंधा कुलकर्णी – परेश मोकाशी, नितीन पंडित नंदन, नागराज मंजुळे – हेमंत अवताडे
सर्वोत्कृष्ट संवाद – मृणाल कुलकर्णी, प्रताप माधवराव फड, मधुगंधा कुलकर्णी – परेश मोकाशी, प्राजक्त देशमुख, नागराज मंजुळे – हेमंत अवताडे, कल्याणी पाठारे – आदित्य इंगळे
सर्वोत्कृष्ट खलनायक – रविराज कांदे, यशपाल सारनात, शिवानी सुर्वे, उपेंद्र लिमये, प्रवीण विठ्ठल तरडे, सयाजी शिंदे
सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार – सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, पार्थ भालेराव, परितोष पेंटर, नम्रता संभेराव, प्रथमेश परब
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री – मेधा मांजरेकर, उर्मिला कोठारे, छाया कदम, ऋचा आपटे, अनिता दाते, खुशी हजारे
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता – अशोक सराफ, विठ्ठल काळे, सुव्रत जोशी, किशोर कदम, परितोष पेंटर, सुबोध भावे
सर्वोत्कृष्ट छायांकन – अर्जुन सोरटे, संजय जाधव, वासुदेव राणे, विक्रम अमलाडी, वासुदेव राणे, महेश लिमये
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – हेमंत अवताडे, परेश मोकाशी, रितेश देशमुख, प्रताप माधवराव फड, शंतनू गणेश रोडे, नितीन सिंधुविजय सुपेकर
सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्री – हृता दुर्गुळे, सायली संजीव, जेनेलिया देशमुख, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर
सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेता – स्वप्नील जोशी, रितेश देशमुख, अमेय वाघ, ओंकार भोजने, नागराज मंजुळे, अंकुश चौधरी
सर्वोत्कृष्ट निर्माता – (अनन्या) संजय छाब्रिया, ध्रुव दास, रवी जाधव, (घर बंदूक बिर्याणी ) झी स्टुडिओ आणि नागराज पोपटराव मंजुळे, (वाळवी) झी स्टुडिओ आणि मधुगंधा कुलकर्णी, (सरला एक कोटी) आरती चव्हाण, (गोष्ट एका पैठणीची) अक्षय विलास बर्दापूरकर, (वेड) जेनेलिया देशमुख