*सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेस “बँको ब्ल्यू रिबन २०२३” पुरस्कार जाहिर*
सिंधुनगरी
अविज पब्लिकेशन, कोल्हापूर ही संस्था सहकार क्षेत्रासाठी देशपातळीवर एक मार्गदर्शक
संस्था म्हणून १९९९ पासून कामकाज करीत असून, या संस्थेमार्फत विविध प्रकारच्या संस्थांची कामकाज पध्दती, सहकार क्षेत्रातील कायदे कानून व त्यामध्ये वेळोवेळी होणारे बदल, आधुनिक तंत्रज्ञाना बाबतची अद्यावत माहिती संकलन व प्रसिध्दीचे कामकाज केले जाते. बँकींग क्षेत्रावर होणारे हल्ले,बदलती टेक्नॉलॉजी, नवनवीन बँकींग संकल्पना, कर्जदारांची मानसिकता, बँकांचा एन.पी.ए याबरोबरच बँकींगमधील घडामोडी बाबतची अद्यावत माहिती बँको डायरीच्या माध्यमातून प्रसिध्द केली जाते.
या संस्थेमार्फत प्रतिवर्षी सहकार क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या व उत्कृष्ट
कामकाज करणाऱ्या विविध प्रकारच्या बँकिंग कामकाज करणाऱ्या संस्थांसाठी पुरस्कार प्रदान केले जातात. बँकेने आर्थिक मापदंडाचे उत्कृष्टरित्या पालन केल्याने तसेच राज्यातील जिल्हा बँकाविभागात ठेवींमधील केलेली वाढ, तसेच स्वमालकीचे डाटा सेंटर उभारुन सीबीएस प्रणालीद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन ग्राहकांना बँकींग क्षेत्रातील विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या गटातून आपल्या बँकेस “बँको ब्ल्यू रिबन २०२३” पुरस्कार जाहिर करण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला यापूर्वी ७ वेळा बँको पुरस्काराने सन्मानीत केलेले आहे. बँको ब्ल्यू रिबन २०२३ या पुरस्काराचा वितरण सोहळा दि.०५ ऑक्टोबर२०२२ रोजी दमण येथे होणार आहे.
या पुरस्कारांबद्दल जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री.मनिष दळवी यांनी समाधान व्यक्त केलेले असून, या पुरस्कारांचे श्रेय त्यांनी बँकेचे संचालक, अधिकारी / कर्मचारी व ग्राहक यांना दिलेले आहे.
तसेच भविष्यात जिल्हा बँकेकडून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विविध प्रकारच्या सेवा-सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन देऊन बँकेच्या “आपली माणसं आपली बँक” या ब्रिदवाक्याप्रमाणे बँकेचे कामकाज
यापुढेही चालू राहिल अशी ग्वाही दिलेली आहे.
*संवाद मिडिया*
*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.
Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*
*COLLEGE CODE-6191*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.
• Duration : 4.5 Years
*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*
*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*