*आ. वैभव नाईक यांची राजकीय कारकीर्दच संघर्ष आणि आव्हानांची त्यामुळे येणारी आव्हाने देखील ते यशस्वीरीत्या पेलतील – संदेश पारकर*
*राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला काय दिले हे जाहीर करावे- भाई गोवेकर*
*सत्ता असताना आणि नसताना देखील मतदारसंघाच्या विकासासाठी माझे प्रयत्न-आ. वैभव नाईक*
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न*
संघर्ष आणि आव्हाने आ. वैभव नाईक यांनी याआधीच पेलली आहेत. त्यांची राजकीय कारकीर्दच संघर्ष आणि आव्हानांची राहिली आहे. पूर्वी काही लोक शिवसेना संवणार,मला परमेश्वर आला तरी हरवू शकत नाही अशा वल्गना करत होते. त्यांचे आव्हान आ. वैभव नाईक यांनी संघर्षाच्या रूपाने पेलून यशस्वी झाले. आज देखील शिवसेने फूट पडली तरी वैभव नाईक निष्ठावंत राहिले.कोणत्याही अमिषाला बळी पडले नाहीत. हे सामान्य जनतेने डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे जनतेचा आशीर्वादहि त्यांच्या पाठीशी आहे. मात्र दिड वर्षाच्या कार्यकाळात राज्य सरकराने जिल्हयासाठी काय दिले हा प्रश्न विचारण्याची आता वेळ आहे.
सरकारमधील मंत्री, आणि राणे कडून वैभव नाईक यांना कितीही घेरण्याचा प्रयत्न झाला तरी. तुमच्यासारख्या शिवसैनिकांच्या साथीने सर्व आव्हानांवर मात करून आ. वैभव नाईक पुन्हा एकदा यशस्वी होतील.आणि कुडाळ मालवणची जनताही त्यांना साथ देईल असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी व्यक्त करत जिल्हाप्रमुख म्हणून मी त्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहीन असे सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका कार्यकारिणीची बैठक आज जानकी हॉल कुंभारमाठ मालवण येथे आमदार वैभव नाईक,जिल्हाप्रमुख संदेश पारकर,माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर,मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर माजी बांधकाम सभापती मंदार केणी,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी संदेश पारकर बोलत होते.यावेळी जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल मालवण शिवसेनेच्या वतीने संदेश पारकर यांचा सत्कार करण्यात आला.
भाई गोवेकर म्हणाले, वैभव नाईक हे आमदार झाल्यापासून सातत्याने मतदारसंघाच्या विकासासाठी झटत आहेत. प्रत्येक गावात त्यांनी आपले काम उभे केले आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा राणे केंद्रात मंत्री होऊन ४ वर्षे झाली त्याचबरोबर राज्यात दिड वर्षे राणे डबल इंजिन सरकारमध्ये सत्तेत असून देखील राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला काय दिले हे जाहीर करावे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम कोणालाही जमले नाही ते आ. वैभव नाईक यांनी करून दाखवले. त्यामुळे छत्रपतींचा,आमच्या सारख्या मावळ्यांचा, आणि शिवप्रेमींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे.त्यामुळे वैभव नाईक यांची कारकीर्द आणखी उज्ज्वल होणार आहे असे सांगितले.
आ. वैभव नाईक म्हणाले,माझी लढाई कोणाशी आहे यापेक्षा कोणाच्या पाठीशी उभे राहायचे हे लोक ठरवणार आहेत. मी आमदार झाल्यापासून जनतेच्या हितासाठी जनतेत मिसळून काम करत आहे. थेट जनतेशी संपर्क ठेवून त्यांच्या समस्या प्रश्न सोडवीत आहे. सत्ता असताना आणि नसताना देखील मतदार संघाच्या विकासासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. यापुढील काळातही माझे असेच प्रयत्न सुरु राहणार आहेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बाबी जोगी,उपशहर प्रमुख सन्मेष परब,माजी नगरसेवक नितीन वाळके,युवासेना तालुका प्रमुख मंदार गावडे, गणेश कुडाळकर,अमित भोगले, भाऊ परब, बाळ महभोज, महीला उपजिल्हा संघटक सेजल परब, महिला तालुका प्रमुख दिपा शिंदे,शहर प्रमुख रश्मी परुळेकर, सिद्धेश मांजरेकर,तपस्वी मयेकर, आडवली मालडी विभागप्रमुख बंडू चव्हाण,आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, मसुरे विभागप्रमुख राजेश गावकर, पेंडूर विभाग प्रमुख कमलाकर गावडे, पोईप विभाग प्रमुख विजय पालव, भाई कासवकर, प्रशांत सावंत,बाबू टेंबुलकर, दर्शन म्हाडगूत, कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, कांदळगाव सरपंच रणजित परब,मसुरे सरपंच संदीप हडकर,तळगाव सरपंच लता खोत, उदय दुखंडे,भाऊ परब, दीपक परुळेकर, किशोर कासले, शिवराम पालव,जयेश नार्वेकर,सतीश राठोड, प्रशांत भोजने,राहुल परब,राहूल सावंत, वायरी माजी सरपंच साक्षी लुडबे,सुर्वी लोणे,निनाक्षी शिंदे,करण खडपे,हिना कांदळगावकर,आरती नाईक,संजना रेडकर,आदींसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संवाद मीडिया*
🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-
ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा
समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport
2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*