You are currently viewing राष्ट्रीय लोकअदालतला उत्तम प्रतिसाद; लघुवाद न्यायालयात १९ प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालतला उत्तम प्रतिसाद; लघुवाद न्यायालयात १९ प्रकरणे निकाली

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमाला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून १९ प्रकरणे निकालात निघाली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यांतील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे.

लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल. आणेकर तसेच श्रीमती ए. एस. खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम यशस्वी झाले. अतिरिक्त मुख्य न्यायाधीश सर्वश्री एस. एस. देशपांडे, न्यायाधीश व्ही. जी. उपाध्ये, डी. एस. दाभाडे, एस. एन. गोडबोले, वकील सर्वश्री प्रतिक्षा विचारे, जितेश शाह यांनी लोकअदालतचे काम पाहिले. अप्पर प्रबंधक निलम शाहीर व अतुल जी. राणे यांनी लोकअदालतचे यशस्वी आयोजन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा