You are currently viewing भिंतीपलीकडील अज्ञान

भिंतीपलीकडील अज्ञान

*”मेघनुश्री” या टोपण नावाने लिहिणाऱ्या लेखिका पत्रकार मेघा कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*भिंतीपलीकडील अज्ञान*

 

शीर्षकामुळे वाचनाची उत्सुकता वाढावी हा उद्देश आहेच, तसेच हा स्वानुभव भविष्यांत इतरांना उपयोगी पडावा हा प्रामाणिक हेतूही आहे. लग्नानंतर लगेचच १२ मार्च २००३ ला मी कोल्हापूर-पुणे इकडून बंगलोरला प्रयाण केले आणि पुढे वीस वर्षे या राजधानीच्या शहरांत वास्तव्य झाले. ‘भारतीय विज्ञान संस्था’- Indian Institute of Science ज्याला स्थानिक Tata Institute असे संबोधतात. विशाल असा परिसर, संशोधकांचे जग अनुभवायला मिळाले. जिथे PHD किंवा इतर अभ्यासक्रम करत असल्याशिवाय गेटच्या आंत प्रवेशही मिळत नाही, तिथे माझा मुक्त संचार सुरू झाला, तो म्हणजे या संस्थेत पतीच्या कार्यरत असल्यामुळे. एकदा फाटक ओलांडून आंत आलांत कि प्रचंड शांतता आणि गर्द वनराई तुमचे स्वागत करते. शास्त्रज्ञांचे जग जवळून पहाता येते. मी कला शाखेची पदव्युत्तर एम.ए.[मराठी] असल्यामुळे सुशिक्षितांच्या या विश्वांत मान मिळत राहिला. माझ्यासाठी हे सर्व पूर्णपणे नवीन त्यात अगदीच थोडी येणारी कन्नड भाषा आणि सतत करावा लागणारा इंग्रजीचा वापर यांमुळे प्रथम बावचळून जायला व्हायचे. तरी कोणताही सेमिनार, कॉन्फरन्स चुकवली नाही.

या सगळ्यातून मी काहीतरी चांगले ऐकतेय, घेतेय असा पतीचा ठाम विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला. भाषा, प्रांत सर्वच वेगळे तरी जोडीदार मराठमोळा असल्यामुळे घरांत मराठी पुस्तकांची रेलचेल होती. त्यावेळी ओळखीपाळखी जास्त नसल्यामुळे घरची सर्व कामे उरकल्यावर दुपारच्या वेळी पुस्तकवाचनांत वेळ जाऊ लागला, यांमध्ये १० वर्षे गेली. १९९६-९७ ला महाविद्यालयीन वार्षिक अंकातून ललित लेख, प्रवासवर्णन प्रसिध्द झाले होतेच. वर्ष २०१४ ला ‘सकाळ वृत्तपत्र’ कोल्हापूर येथून दोन कविता छापून आल्या. यावेळी तर आईवडिलांचा आनंद गगनांत मावेना. खरे तर उत्तम अभ्यासक, विषयाचे सखोल ज्ञान असे या संस्थेतील वातावरण त्यामुळे वाचनातली हीच दहा वर्षे पुढील लेखनासाठी उपयोगी पडू लागली. एक प्रेरणास्रोत म्हणूनच यांकडे पाहिले. अनेक उत्तुंग व्यक्तिमत्वांचा साधेपणाही नजरेत भरण्याजोगा होता. दिवसरात्र न म्हणता स्वतःचा अभ्यासक्रम, संशोधनावर कार्यरत रहाणारे, अत्यंत वेगळी विचारधारा असणारे लोक इथे भेटले.

मी भाषेची अभ्यासक, वाचनांतून मिळत गेलेली लेखनप्रेरणा हेच आयुष्याचे ध्येय असे मनांत असतानाच वर्ष २०१६ उजाडले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून एम.ए.हिन्दी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. मनांतला आनंद चेहऱ्यावर लपत नव्हता. प्रत्येक सत्राचे अभ्यास साहित्य घेऊन कोल्हापूरहून बंगलोरला जायचे, घरचे सर्व कामकाज, जबाबदारी यांत तसूभरही कमतरता न करता हे पदव्युत्तर परीक्षेचे आव्हान पेलायचे होते, अभ्यासासाठी मिनिट-मिनिट, तास-तास महत्वाचा होता. वेगळ्या ध्येयाने मन प्रेरित झाले होते. इथे मात्र आवर्जुन नमूद करावेसे वाटते, आयुष्यांत एखादे पर्व असे येते कि, कालावधी कितीही जाऊ द्या त्याचे वेळोवेळी स्मरण होतेच. अगदी छान आठवणी असतात अशाताला भाग नाहीच, तरीही मनावर उमटलेला ओरखडा ताजाच रहातो. एकीकडे संशोधक, शास्त्रज्ञांचे विश्व नशीबाने मिळाले होते, तर दुसरीकडे गावभागांतील वस्ती आणि अडाणी शेजारीपाजारी यांच्याशी जबरदस्त टक्कर द्यावी लागली. वयाच्या चाळीशी नंतर कशाला शिकायला हवे? ही विधाने जाता येता ऐकू येऊ लागली. वेगळी वाट पकडताना आपण यांच्या चर्चेचा विषय ठरतोय हे क्षणोक्षणी जाणवू लागले. विचारधारांचे सूर कधीच जुळणार नाहीत हे समजून आले. राजधानी सारख्या शहरांतील दोन भाग अनुभवयांस मिळाले. म्हणूनच विज्ञान संस्थेच्या भिंतीपलीकडील अज्ञान कायमस्वरूपी मनांत रुतून राहिले.

याच दरम्यान वर्ष २०१७ साली अनाहूतपणे पितृछत्र हरपले, पण मायमाऊलीने कच न खाता ध्येयपूर्तीची जाणीव करून दिली, “वडिलांचे स्वप्न पूर्ण कर” या शब्दांत इतरांनीही मला उभारण्याची क्षमता दिली. एम.ए.हिन्दी पूर्णत्वास गेलेच त्यानंतर वर्ष २०१९ ला मराठीतील पहिला कथासंग्रह ‘स्नेहांकूर’ चे प्रकाशन झाले, ज्याला २०२१ चा ‘करवीर साहित्य परिषद पुरस्कार’ ही लाभला. कालौघांत हळूहळू चित्र पालटले. नावासमोर दोन भाषेतील पदव्युत्तर ही शैक्षणिक पात्रता झळकू लागली. एका वेगळ्या अस्तित्वाने माझ्या अंतरंगात प्रवेश केला होता. बंगलोर मध्येही आता लेखिका म्हणून ओळख निर्माण झाली होती. वर्ष २०२० कोरोनाच्या काळांत बंदोवस्तास उभे असणारे पोलीस बांधव, माझ्याशी नीट बोलत आहेत, माहिती देत आहेत यांमुळे ज्ञानाला किती मान असतो हे आता गावभागांतील वर्गालाही समजले. त्यांच्यातच बुजरेपणा जाणवू लागला, संवाद साधण्याची त्यांची धडपड सुरू झाली. कारण ते लोक आता दुरून का होईना माझे यश पहात होते. वैचारिक असमतोलामुळे जो अबोला निर्माण झाला होता तो आता कमी होऊन गरजेपुरता मर्यादित ठेवण्याचा विचार मी केला.

वर्ष २०२१ पासून सन्मान, पुरस्कार लाभू लागले, जणू एक सोनेरी पानाप्रती हे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. पुढे २०२२ ला पत्रकारितेची परिक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होताच एक वेगळीच दिशा मिळाली. त्यांत सर्वांनाच आणखी एक मोठा बदल स्वीकारावा लागला, कोरोनाच्या काळांत दोन वर्षांत सर्वत्र कार्यालयीन कामकाज ऑनलाईन सुरू झाले. घरांतून दिवसभर काम करताना यांना हे जाणवू लागले, सतत फिरत्या विक्रेत्यांच्या आवाजांत, एम.ए. हिन्दीचा अभ्यास करत असताना शेजारीपाजारी केवळ त्रास देण्याच्या वृत्तीने घालत असलेला धुमाकूळ यांत माझा अभ्यास कसा झाला असेल ? पण म्हणतात ना…..जे होते ते चांगल्यासाठीच. कायमस्वरूपी कामकाजाची पद्धत दूरस्थ अंतरावरून होत असतानाच आणि कार्यालयीन दैनंदिन उपस्थिती न रहाता घरूनच कामकाज सुरू ठेवता येतेय याची पुढील दोन वर्षे वारंवार खात्री करून घेत एका निर्णयाप्रत आलो. “महाराष्ट्रांत आपल्या सग्यासोयऱ्यांसोबत इथून पुढचे आयुष्य घालवायचे.” मोठ्या शहरांत मनसोक्त राहूनही झाले होतेच.

आम्ही घर, शहर सोडतोय ही वार्ता गल्लीभर पसरली. खरे तर सुशिक्षित-अशिक्षित असा सरसकट भेदभाव न करता वातावरण चांगले ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न होता, तो मात्र प्रामाणिकपणे फार कमी लोकांना समजला. निंदकाचे घर जरी शेजारी असले तरी त्या सगळ्याला सुद्धा कुठेतरी एक मर्यादा असावी लागते. घरमालक उच्चशिक्षित असल्याने मी काय काम करते हे त्यांना कधीच वेगळे सांगावे लागले नाही, ही एक जमेची बाजू होती. डिसेंबर २०२२ नंतर आमचीही तयारी सुरू झाली. पतीचे आजोळ रत्नागिरी शहरांत वास्तव्य कारावे असे ठरवले. आधीच्या सहलींमधून कोकणांतील शांतता मनांला भुरळ घालत राहिली. अनेक वर्षांपासूनचे मनांतले स्वप्न सत्यात उतरले. अखेर १२ फेब्रुवारी २०२३ ला सामानासहित बंगलोर शहरांस अखेरचा दंडवत घातला.

बंगलोर-कोल्हापूर प्रवासानंतर अंबाघाट उतरून रत्नागिरीस स्थायिक झालो. साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण अतिशय सुरेख लाभत आहे. गृहिणी ते लेखिका-पत्रकार,एका माध्यमसमूहाची उपसंपादक असे कार्यरत असताना माहेर कोल्हापूर कर्मभूमी म्हणून लाभले हेच थोर भाग्य. यांमुळे आता म्हणावेसे वाटते…..

“विज्ञान विश्वाची भासे दिव्यता,

भिंतीपलीकडील अजाणतेची सांगता,

जीवनांतील एका पर्वाची पूर्णता..

सह्यसिंधू च्या साथीने मिळे प्रबळता.”

 

मेघनुश्री : लेखिका, पत्रकार

मोबाईल ७३८७७८७५१२

ईमेल – megha.kolatkar 21@gmail.com

 

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा