कुडाळ येथे वसंतराव डावखरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण, निरंजन डावखरे यांचा उपक्रम
कुडाळ
कुडाळ येथील शासकीय सार्वजनिक ग्रंथालयात तयार केलेला स्पर्धा परीक्षा विभाग व स्वर्गीय वसंतराव डावखरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे (ई-लायब्ररी) लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. या केंद्रामुळे कुडाळ शहराबरोबरच अन्य तालुक्यांतून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना सहजगत्या दर्जेदार पुस्तके उपलब्ध होणार आहेत
शासकीय ग्रंथालयात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद शिरसाट, अक्षता बांदेकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कुडाळ सार्वजनिक ग्रंथालयाला १६३ वर्षांचा समृद्ध वारसा आहे. या ठिकाणी सुरू झालेल्या केंद्रामुळे कुडाळ तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध होतील. नव्या स्पर्धा मार्गदर्शन केंद्रामध्ये संगणक व्यवस्था, आसन व्यवस्था, मोफत इंटरनेट, ऑनलाइन अभ्यासक्रम, करिअर मार्गदर्शन प्रोजेक्टरची सुविधा, ई-बुक्स, आदी विविध सुविधा विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून ग्रंथालयांचे रूप हळूहळू बदलत आहे. ग्रंथालयांच्या अनुदानातही वाढ करण्यात आली आहे. ग्रंथालयाच्या कार्यपद्धतीमध्ये अतिशय सकारात्मक पद्धतीने सुधारणा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले `डिजिटल इंडिया’चे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
कै. वसंतराव डावखरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम स्तुत्य आहे. या लायब्ररीच्या माध्यमातून बदलत्या जगातील घडामोडींसह सामान्य ज्ञान वाढविण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन शिक्षणमंत्री केसरकर यांनी केले.
यूपीएससी, एमपीएससीच्या परीक्षांमध्ये कोकणातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्यासाठी ई-लायब्ररी महत्वपूर्ण ठरेल. त्याचा कुडाळ शहर, तालुका व लगतच्या भागातील विद्यार्थ्यांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले. कुडाळप्रमाणे इतर सात शहरांतील सार्वजनिक ग्रंथालयांमध्येही स्वर्गीय वसंतराव डावखरे स्पर्धा परीक्षा केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
*संवाद मीडिया*
🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-
ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा
समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport
2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*