केसरी येथे होणाऱ्या “फिश थीम पार्क”चे उद्या उद्घाटन…
कुडाळ
सावंतवाडी तालुक्यातील केसरी गावात उभारण्यात येणाऱ्या विविध रंगी माशांच्या पार्कच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ उद्या सकाळी १० वाजता करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पात सर्व प्रकारच्या साडेतीन हजारहून अधिक माशांचा समावेश असेल, असे ते म्हणाले.
येथील एमआयडीसी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरे, कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, युवा मोर्चा अध्यक्ष भाई सावंत, भाजप पदाधिकारी राजू राऊळ, निलेश तेंडुलकर, दीपक नारकर, चेतन धुरी आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चव्हाण म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गाने नटला आहे. सावंतवाडी तालुक्यातील आंबोली घाट, परिसर आणि धबधबा ही राज्याची ओळख आहे. जिल्ह्यात चांगले एक्वारियम केल्यास पर्यटनाच्या दृष्टीने चांगले होईल. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथे रंगीत मत्स्यपालन व एक्वारियमसाठी गेले वर्षभर प्रयत्न सुरू होते. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्याचा प्रारंभ उद्या माझे वडील दत्तात्रय चव्हाण आणि आई शुभांगी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विविध पक्षांचा प्रकल्प करण्यात येईल. या प्रकल्पाच्या जवळच आंबोली हे पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल.
श्री. चव्हाण पुढे म्हणाले, विविध रंगी व विविध जातीचे रंगीबेरंगी असे गोड्या, खाऱ्या पाण्यासह विविध देशातील मासे या पार्कमध्ये आहेत. माशांचे प्रजनन व पालन करण्यात येणार आहे. त्यामुळे हे सर्व मासे पाहता येणार आहेत. विद्यार्थ्यांनाही या माशांचा अभ्यास करता येईल. एका लहान तळ्यात फिशिंगची सुविधाही आहे. नदीतून चालण्याचा अनुभवही घेता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राच्या माध्यमातून सुरू केलेल्या मत्स्यसंपदा योजनेतून १० हजार कोटी निधी खर्च केला आहे. रंगीत मासेपालन व पैदास यातून व्यवसाय निर्माण होऊ शकतो. कोकणात यासाठी मोठी संधी आहे. दरम्यान मुंबई-गोवा महामार्ग आता वाहतुकीसाठी सुरळीत केला आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी एक लेन वाहतूक असेल, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
*संवाद मीडिया*
🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-
ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा
समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport
2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*