*देवगड तालुक्यातील सोशल क्लब जुगारांचे अड्डे*
*संवादच्या बातमीनंतर सिंधुदुर्गातील सोशल क्लब बंद…! अपवाद देवगड तालुका*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोशल क्लब च्या नावाखाली बऱ्याच ठिकाणी पत्त्यांचे खेळ मांडून जुगारासारखे अवैद्य धंदे निर्धास्तपणे सुरू होते. दिवसाला लाखाच्या घरात मलिदा जमविणारे सोशल क्लब असा कोणता खेळ खेळत होते ज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा जमा होतो? परंतु असा प्रश्न जिल्ह्यातील कायद्याचे रक्षण करणाऱ्या कोणत्याही खात्याला पडत नाही ही कमालीची बाब आहे. संवाद मीडिया मधून वारंवार यावर आवाज उठविण्यात आला त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे सोशल क्लब बंद झाले परंतु याला अपवाद म्हणजे देवगड तालुक्यातील “बाईबाबा” “गणपती क्लब” अशी नावे ठेवलेले व देवाधर्माच्या नावावर अवैद्य धंदे चालविणारे क्लब..!
देवगड तालुक्यात जाम संडे असो वाडा अशा काही ठिकाणी सुरू असलेले हे क्लब म्हणजे जुगाराचेच अड्डे. वरवर “सोशल क्लब” असे नाव देत या क्लबमधून पत्त्याचे खेळ खेळले जातात. रमी तीन पत्ती अशा खेळांमधून पैसे लावून जुगार खेळला जातो, त्यामुळे गावागावातील तरुण पिढी आपल्या भवितव्याची दिशा हरवून जुगारासारख्या अवैद्य धंद्याच्या नादी लागली आहे. देवगड येथे “बाई-बाबा” सोशल क्लब व “गणपती कृपा क्लब” असे काही क्लब खुलेआम सुरू असून या दोन्ही क्लब वर मिळून एका दिवसाला तब्बल १४००००/- एवढी उलाढाल होते. सोशल क्लब मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिवसाकाठी पैसा जमा होणाऱ्या आणि खाकीची मेहरनजर असणाऱ्या या “बाई बाबा” क्लबचे अध्यक्ष कोण.?? याची चर्चा मात्र “जेवणाबरोबर लोणचे तोंडी लावावे” तशीच चवीने कणकवली देवगडमध्ये सुरू आहे. “सोशल” क्लब च्या नावाने जुगाराचे “ऑफिशियल” अड्डे झालेल्या या क्लबना खाकी वर्दी का पाठीशी घालते? लोकांना जे दिसते ते खाकी वर्दीला दिसत नाही का? खाकी वर्दी देवगड तालुक्यातील या क्लब वर कारवाई करणार आहे की नाही? असा प्रश्न देवगड येथील सुजाण नागरिक उपस्थित करीत आहेत.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*