You are currently viewing दहीहंडीच्या निमित्ताने

दहीहंडीच्या निमित्ताने

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी अरुण कोर्डे लिखित अप्रतिम लेख*

 

*दहीहंडीच्या निमित्ताने*

*****************

आज कालाष्टमी. दहीहंडी बांधली जाईल. त्या निमित्ताने माझे विचार मांडीत आहे.

 

दहीहंडी हा खेळ आहे किंवा नाही हे ठरवणं कदाचित कठीण आहे , पण तो उत्सव नक्कीच आहे. हिंदुधर्मात अनेक उत्सव आहेत , त्यातलाच हा एक. काही उत्सव कलाकार निर्माण करतात तर काही उत्सवांचा त्रास वाटतो. दही हंडी रस्त्यावर खेळण्यापेक्षा

मोठ्या मैदानात खेळला गेला तर जास्त योग्य ठरेल. वाहतुकीचा खोळंबा, गर्दीमुळे होणारे अपघात आणि मनोरे रचणाऱ्यांना होणाऱ्या शारीरीक इजा‍. ज्यामुळे कदाचित कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकेल. तसेच गर्दीमुळे पादचाऱ्यांना जाण्यासाठी मार्ग राहत नाही. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. या गर्दीतून बाहेर पडणं फार कठीण आहे. अशा वेळेला रिक्षात असाल तर जास्तीत जास्त पैसे घालवण्याची तयारी ठेवावी लागते, कारण कितीक वेळेला वाहतुकीचे मार्ग बदललेले असतात. त्याची सूचनाही कधी कधी आगाऊ दिली जात नाही. तसेच या दहिहंड्यांवर लाखो रुपये लावले जातात, त्या मोहापायी गोविंदा धोके पत्करतात. हे लाखो रुपये लावणारे लोक प्रत्यक्षात गरजू माणसाला (तो मतदारपण असतो) पैशाची कितपत मदत करतात कोण जाणे. पण राजकारणी लोक स्वतःची प्रसिद्धी करून घेतात हे नक्की. रस्त्यावर हा उत्सव साजरा करायला निर्बंध आणावेत , हे बरे. गणपती उत्सवातही तेच होते. रस्त्याच्या मध्येच मंडप घातलेले आढळतात. बोलण्याची किंवा तक्रार करण्याची सोय नसते. आपले उत्सव साजरे करायला काहीच हरकत नाही, पण लोकांची गैरसोय होत नाही ना हे पाहणं आवश्यक आहे. मग तो उत्सव सामान्य असो वा नसो. ठाण्यातील बरेचसे विभाग पाहावेत. तसच अशा उत्सवांना राजकारणी लोकांचं पाठबळही कमी व्हावं असं वाटतं. त्यांचा खेळ होतो पण बाकीच्यांची गैरसोय होते हे नक्की.

 

अरूण कोर्डे

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा