You are currently viewing अविस्मरणीय शिक्षक दिन!

अविस्मरणीय शिक्षक दिन!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी लेखक गझलकार श्री जयराम धोंगडे लिखित अप्रतिम लेख*

 

*अविस्मरणीय शिक्षक दिन!*

 

‘जयराम, तुम्ही कुठं आहात? मला हर्नियामुळे खूप वेदना होत आहेत… काय करू?’ मला माझ्या सरांचा फोन आला. सोमवार असून मी घरीच होतो… माझे डोळे आले होते… डोळ्याच्या साथीचा आजार जोरात सुरू होता.

 

‘सर, मी आज घरीच आहे परंतु तुम्ही विश्व हॉस्पिटलमध्ये जा… मी फोनवरून सर्व मॅनेज करतो, चिंता करू नका!’ असे सरांना सांगितले. लगोलग हॉस्पिटलमध्ये डॉ.जळबाजी मोरे सरांना, ‘माझे इंग्रजीचे प्राध्यापक असलेले, मला अकरावी-बारावीत शिकवलेले माझे सर प्रा. व्ही.ए. भोसले येत आहेत… त्यांना तपासून उपचार व समुपदेशन करण्याची विनंती केली’ सोबतच स्वागतकक्षातही तशा सूचना केल्या… सर आले तेंव्हा ताबडतोब त्यांना तपासले. हर्नियामुळे होणाऱ्या प्रचंड वेदनेमुळे सर जवळपास रडत होते. डॉ.मोरे सरांनी हर्नियामुळे ओटीपोटात उतरलेले पोटातील आतडे आत पोटात लोटले. वेदना कमी केल्या परंतु शस्त्रक्रिया करणे अनिवार्य असल्याचे सांगितले.

 

मला पुन्हा सरांचा फोन आला. ‘जयराम, माझे बाहेर आलेले आतडे सरांनी ‘स्किलफुली’ आत लोटले, माझा जीवघेणा त्रास थांबवला… ते ऑपरेशन आवश्यक आहे म्हणतात पण आम्ही सोयीनिशी आलो नाही, कसे करू?’ मी म्हणालो, ‘बाकी पैशाची वगैरे काळजी करू नका, ऍडमिट व्हा… मी उद्या आलो की पाहून घेतो’. परंतु त्यांची नुकतीच बाळंत झालेली कन्या घरी एकटी होती… जावई आलेले. उद्या येतो म्हणून ते परत उमरखेडला गेले. ‘आजार अंगावर काढू नका… शस्त्रक्रिया कुठेही करा पण लवकर करून घ्या!’ मी काळजीपोटी सांगितले.

 

दुसरे दिवशी सकाळी पुन्हा सरांचा फोन आला. मी ऑपरेशनसाठी येत आहे म्हणून कॉल होता. बुधवारी (२३ ऑगस्ट) आल्यावर शस्त्रक्रियेपुर्वीच्या सर्व आवश्यक तपासण्या केल्या. गुरुवारी सकाळी दुर्बिणीद्वारे हर्नियाची दोन्ही बाजूची शस्त्रक्रिया झाली. आठ दहा वर्षांपासून केवळ भीतीपोटी लांबत राहिलेली शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शनिवारी सुट्टी झाली. त्यांच्या सेवेत मला तीन दिवस देता आले. सर आनंदाने कृतार्थ झाले. मलाही माझ्या सरांसाठी काही करता आल्याचा मनोमन आनंद वाटला.

 

आज ५ सप्टेंबर… ‘शिक्षक दिन’… आज फेरतपासणी आणि टाके (दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केल्यामुळे केवळ चार टाके) काढण्यासाठी आदरणीय प्रा.भोसले सर यांना बोलावले होते. सर्व जखमा भरून आल्या… टाके काढले… आणि अगदी ठणठणीत बरे झाल्याचा त्यांचा उत्साह आणि माझे कौतुक करतांना त्यांना होणारा आनंद मलाही सुखावून गेला.

 

या निमित्ताने मला माझ्या गुरुवर्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली… शिक्षक दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेता आले, यापेक्षा आणखी दुसरे भाग्य ते काय असते!

 

सरांना उदंड आयुरारोग्य लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो!

 

जयराम धोंगडे

 

(छायाचित्रण साहाय्य: प्रशांत पिंपळे/ सोबत सरांचे चिरंजीव इंजि.उमेश भोसले)

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा