स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा :
सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची संपूर्ण योजना व तयारी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या स्वबुद्धिमत्तेच्या योजनेमुळे या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची सृजनशीलता प्रकाशित झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत व सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांचे गुलाब पुष्प देऊन व गीत सादर करून स्वागत केले. इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांबद्दल आपली मते मांडून त्यांच्याबद्दल आपल्या मनातील आदरभाव व्यक्त केले. त्याचप्रमाणे ५ वी च्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी करमणुकीसाठी नृत्य सादर केले. तसेच, विविध चिठ्ठयांच्या माध्यमाने शिक्षकांसाठी खेळ आयोजित केले. कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले व आपल्या जीवनात गुरूंची शिकवण किती महत्वाची आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत , शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेचे कौतुक केले. व त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये साजरा झालेला शिक्षकदिन हा विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा व सर्व विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आदरभाव निर्माण करणारा असा ठरला.
*संवाद मिडिया*
*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.
Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*
*COLLEGE CODE-6191*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.
• Duration : 4.5 Years
*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*
*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*