वर्षा मॅरेथॉन स्पर्धा दोडामार्गात उत्साहात
शिक्षणमंत्री केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य;सुधीर सावंत यांची उपस्थिती..
दोडामार्ग
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथे घेण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले तर मंत्री केसरकर यांनी स्पर्धकांना मोबाईलवरून शुभेच्छा संदेश दिला.
दोडामार्ग शिवसेना आयोजित वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल लगेचच जाहीर करण्यात आला. बक्षिस वितरण माजी खासदार ब्रिगेडियर सावंत आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले.विविध गटातील पहिल्या दहा स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे: अठरा वर्षा खालील मुली (अनुक्रमे) 1) संतोषी संदीप सावंत, 2 ) वैभवी एकनाथ नाईक 3) अश्विनी आनंद गवस 4 ) संचिता वासुदेव घोलकर 5) अंकिता अशोक पालयेकर 6) मनाली नारायण गवस 7 दिशा
देविदास बोडेकर 8 ) शर्मिला आपा गवस 9 ) संचिता संतोष जाधव (10) सानिका सत्यवान गावडे
मुले खुला गट 1 ) यश उल्हास नाईक 2) समीर उदय मोरजकर 3) गौरेष आनंद नाईक 4 ) सप्रेश प्रकाश शिरसाठ 5) शुभम सीताराम देसाई 6) बाबु बळी वरक 7) शिवराज सुनील गवस 8) सुनील मोहन गवस 9 ) योगेश नंदकिशोर बांदकर 10) प्रसाद दयानंद नाईक
14 वर्षा खालील मुली…1) श्रेया राजन झोरे 2) वेदा विष्णू गवस 3 ) सायना सोमा
कदम, 4 प्राची सुनील गवस, 5) सृष्टी राजेंद्र पाटील, ८) प्राची पवन गुरव, ७) देवयानी विजय घाडी, ८) तन्वी कृष्णा मयेकर, ९) द्विजा गीतेश कळंगुटकर10) सुषमा नाना पाटील.
स्पर्धेची सुरवात आणि बक्षिस वितरण यावेळी व्यासपीठावर माजी खासदार सुधीर सावंत तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, प्रेमानंद देसाई, शैलेश दळवी, राजेंद्र
निंबाळकर,भगवान गवस,दादा देसाई,रामदास मेस्त्री,दयानंद धाऊसकर, संजय गवस,मायकल लोबो दादा पालयेकर, गोपाळ गवस आदी उपस्थित होते