*फलंदाजी भारतीय संघाची ‘विराट’ डोकेदुखी; पावसामुळे भारताचा पराभव टळला*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आशिया चषकामध्ये भारताचा पाकिस्तानसोबतचा पहिला सामना अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा संघ २६६ धावांवर तंबूत परतला. मात्र, त्यानंतर पाऊस आला आणि पुढील खेळ होऊ शकला नाही. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक ८७ धावा केल्या आणि इशान किशनने ८२ धावांचे योगदान दिले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली. याशिवाय केवळ जसप्रीत बुमराहला १५ धावांचा आकडा पार करता आला. तर तिसर्या क्रमांकाच्या धावा (२०) अवांतर स्वरुपात मिळाल्या. टीम इंडिया ४८.४ षटकांमध्ये २६६ धावांवर गारद झाली. महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघाला पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत. ईशान आणि हार्दिकची धावसंख्या काढली तर उर्वरित भारतीय संघ केवळ ९७ धावा करू शकला. यातही २० धावांचे योगदान अवांतर धावांचे होते.
इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी १३८ धावांची भागीदारी करून भारताची मधली फळी कमकुवत नसल्याचे सिद्ध केले. भारतीय खेळाडू दबाव शोषून घेण्यास सक्षम आहेत आणि भक्कम गोलंदाजीसमोरही ते धावा करू शकतात. मात्र, भारताच्या टॉप ऑर्डरची डोकेदुखी वाढली. पुन्हा एकदा रोहित आणि विराटसारखे दिग्गज डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजासमोर अपयशी ठरले. विश्वचषकापूर्वी भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना या आजारावर इलाज शोधावा लागणार आहे. त्याचवेळी आशियाई खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसमोर केवळ २७.५ षटकांत १२९ धावांत सर्व १० विकेट गमावणे ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. टीम इंडियाला त्यांच्या या कमकुवतपणावर काम करावे लागेल.
डावखुर्या वेगवान गोलंदाजांनी अनेकदा भारतीय फलंदाजांना बाद केले आहे. २०१६ आशिया चषक आणि २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोहम्मद आमिर, ट्रेंट बोल्ट आणि त्यानंतर २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत शाहीन आफ्रिदी यांनी भारताच्या शीर्ष क्रमाला उद्ध्वस्त केले होते. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाने डावखुऱ्या गोलंदाजांसाठी विशेष तयारी केली होती, मात्र ती कुचकामी ठरली. शाहीन आफ्रिदीने विराट आणि रोहित या दोघांनाही बाद करून टीम इंडियाला अडचणीत आणले. हरिस रौफनेही त्याला साथ दिली. त्याने श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलला बाद करून भारताची धावसंख्या ६६/४ अशी दयनीय केली. शाहीनने शेवटच्या षटकांमध्येही अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाला बाद करून भारताला ३०० धावा करण्यापासून रोखले.
सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची बरीच चर्चा झाली होती. पाकिस्तानच्या वेगवान त्रिकुटाचा भारतासाठी मोठा धोका मानला जात होता आणि सामन्यातही तसेच झाले. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ या त्रिकुटाने २७.५ षटकांत संपूर्ण टीम इंडियाचा डाव गुंडाळला. या कालावधीत या तिघांनी मिळून केवळ १२९ धावा दिल्या. या तिघांमध्ये फक्त हरिस रौफचा इकॉनॉमी रेट सहापेक्षा जास्त होता.
या सामन्यात भारतीय संघाने ४० षटकात ५ विकेट गमावत २२१ धावा केल्या होत्या. हार्दिक आणि जडेजा ही जोडी खेळपट्टीवर होती. अशा परिस्थितीत टीम इंडिया ३०० चा टप्पा ओलांडेल असे वाटत होते, कारण यानंतर शार्दुल ठाकूरही फलंदाजीसाठी सज्ज झाला होता. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये भारतीय फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. टीम इंडियाला पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत आणि शेवटच्या ८.५ षटकांत केवळ ४५ धावा करून ती सर्वबाद झाली.
६६ धावांत चार गडी गमावल्यानंतर भारतीय संघ संघर्ष करत होता. सर्व महत्त्वाचे फलंदाज बाद झाले आणि कमकुवत मानल्या जाणाऱ्या मधल्या फळीतून मार्ग काढण्याची जबाबदारी टीम इंडियाची होती. प्रथमच पाचव्या क्रमांकावर खेळणाऱ्या इशान किशनने शानदार पुनरागमन केले. त्याने ८१ चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ८२ धावा केल्या. यादरम्यान त्याने हार्दिकसोबत पाचव्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली. हार्दिकने ९० चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८७ धावा केल्या. त्यांनी मोलाची भागीदारी भारताला सामन्यात परत आणले. हे दोघेही बाद झाले तेव्हा भारताची धावसंख्या ४३.१ षटकांत २३९/६ होती. यानंतर सामना संपवण्याची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांच्यावर आली. त्यामुळेच शमीच्या जागी शार्दुलची संघात निवड करण्यात आली. मात्र, दोघेही अपयशी ठरले आणि दमदार पुनरागमन करूनही टीम इंडियाला ३०० चा टप्पा पार करता आला नाही.
या सामन्यात पावसामुळे भारतीय फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला. रोहित आणि गिल यांनी दमदार सुरुवात केली होती. दोघेही सावधपणे खेळत होते, मात्र पावसामुळे दोन्ही फलंदाज बाद झाले. पहिल्यांदा पावसामुळे खेळ थांबला तेव्हा रोहित ११ धावा करून खेळत होता. पावसामुळे सामना थांबवण्यात आला आणि त्याचे लक्ष विचलित झाले. पाऊस थांबल्यानंतर खेळ सुरू झाला तेव्हा चौथ्या चेंडूवरच रोहित बाद झाला. त्याचवेळी दुसऱ्यांदा पावसामुळे खेळ थांबला आणि सामना सुरू झाला तेव्हा आठवा चेंडू खेळताना गिल बाद झाला. ब्रेकपूर्वी त्याने सावध खेळ करत २२ चेंडूत सहा धावा केल्या, पण ब्रेकनंतर त्याने सात चेंडूत आठ धावा केल्या आणि विकेटही गमावली. अशी सारवासारव सामना संपल्यानंतर करण्यात आली. जर ह्यांना फलंदाजी करण्यासाठी अडचण येत होती तर गोलंदाजी करण्यासाठी वेगळं मैदान आणि परिस्थिती होती का? आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधीत्व करताना अशी गल्लीतल्या खेळाडूंसारखी कारणं देऊन चालतील का?
या सामन्यात पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणाचा भारतीय फलंदाजांना चांगलाच फायदा झाला. टीम इंडियावर खूप दडपण होतं, पण पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी कमीत कमी २० अधिक धावा दिल्या, त्यामुळे वेळोवेळी गोलंदाजांवर दबाव येत राहिला. पाकिस्तानने या सामन्यात झेल पकडण्याच्या काही कठीण संधीही गमावल्या. रोहित शर्माने लगावलेल्या पहिल्याच फटक्यावर त्याला झेलबाद करता आले असते, पण पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांना अवघड झेल पकडता आला नाही.
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी करत विकेट घेत भारतावर दडपण आणले, पण अवांतर धावाही दिल्या. त्यामुळे भारताच्या धावगतीवर फारसा परिणाम झाला नाही. पाकिस्तानने या सामन्यात २० अवांतर धावा दिल्या. खराब क्षेत्ररक्षणाच्या २० धावा आणि त्यामुळे भारताच्या धावसंख्येमध्ये मोठा फरक पडला.
या सामन्यात पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज अपयशी ठरले. वेगवान गोलंदाजांनी ६६ धावांत चार बळी घेतले होते. यानंतर मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांनीही विकेट्स घेतल्या असत्या तर भारतीय संघ फार कमी धावसंख्येवर स्थिरावू शकला असता, पण तसे झाले नाही. पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी २१ षटकांत १३३ धावा उधळल्या आणि एकही विकेट घेतली नाही. पाकिस्तानचे दोन प्रमुख गोलंदाज शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांची सरासरी सहाच्या वर होती. त्यामुळे भारताला २५० हून अधिक धावा करता आल्या.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. अशा प्रकारे पाकिस्तानचे दोन सामन्यांत तीन गुण झाले. त्यांनी पहिल्या सामन्यात नेपाळचा पराभव केला होता. दुसरीकडे भारताच्या खात्यात एका सामन्यातून एक गुण जमा झाला आहे. आता सुपर-४ मध्ये पोहोचण्यासाठी भारताला ४ सप्टेंबरला होणाऱ्या सामन्यात नेपाळला पराभूत करावे लागेल. सुपर-४ मध्ये पोहोचणारा पाकिस्तान हा पहिला संघ ठरला आहे.
*संवाद मिडिया*
*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.
Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*
*COLLEGE CODE-6191*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.
• Duration : 4.5 Years
*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*
*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*