जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तसकर यांची माहिती: मलेरिया आणि चिकनगूनियाचे सुद्धा रुग्ण मिळाले..
ओरोस
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात साथ रोगाने कहर केला आहे. ३१४ डेंग्यूचे रुग्ण मिळाले असून १९ मलेरिया रुग्ण मिळाले आहेत. तर चिकनगुणीयाचे ३० रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तसकर यांनी दिली. मात्र, सुदैवाने एकही मृत्यू झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना डॉ कर्तसकर यांनी, जुलै महिन्यात आपल्या जिल्ह्यात धो धो पाऊस पडला. त्यामुळे साथरोगाला मारक ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट झाली होती. परंतु ऑगस्ट महिन्यात पाऊस गायब झाला. अधून मधून पाऊस पडला. त्यामुळे पाणी वाहून न जाता ते डबक्यानी साचून राहिले. परिणामी साथरोगाचा प्रादुर्भाव करणाऱ्या डासांना पोषक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात साथरोगाने डोके वर काढले.